गाडीची घासाघीस झाली आणी रचला जीवे ठार मारण्याचा कट

भारती विद्यापीठ पोलिसांकडून तीघांना अटक
पुणे,दि.24- रस्त्याने जाताना गाडीची किरकोळ घासाघीस झाल्याने एका तरुणाच्या खुनाचा कट रचण्यात आला. यासाठी तब्बल दोन महिणे त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. तो घरी जात असलेल्या रस्त्यावर अपघाताचा बहाणा करत त्याला अडवण्यात आले. यानंतर त्याच्यावर शस्त्राने सपासप वार करण्यात आले. मात्र आजूबाजूला नागरिक जमा झाल्याने आरोपींनी पळ काढल्याने तरुणाचा जीव वाचला. या गुन्हयातील तीघा आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. यातील एक गुन्हेगार उत्तमनगर पोलीस ठाण्यातून तडीपार असून त्याच्यावर तब्बल 11 गुन्हे दाखल आहेत.
सुरेश उर्फ आप्पा प्रकाश मुस्तारी(24,रा.टिळेकरनगर, कोंढवा), सुनिल उर्फ राठ्या गोपाळ राठोड(23,रा.उत्तमनगर), प्रतिक उर्फ पद्या संजय नलावडे(22,रा.येरवडा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील सुनिल राठोडला उत्तमनगर पोलिसांनी तडीपार केले असून त्याच्यावर तब्बल 11 गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी अमित रामदास निंबाळकर(25,रा.हवेली) याने फिर्याद दिली होती.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी अमित निंबाळकर व आरोपी सागर माने याची दोन महिण्यापुर्वी दुचाकी एकमेकाला घासल्याने भांडणे झाली होती. याचा राग मनात धरुन सागर मानेने सुरेश मुस्तारी, सुनिल राडोड आणी प्रतिक नलावडे यांना फिर्यादीवर लक्ष ठेऊन जीवे ठार मारण्यास सांगितले होत. त्याप्रमाणे आरोपी फिर्यादीच्या घरी जाण्या-येण्याच्या मार्गावर मागील काही दिवस लक्ष ठेऊन होते. दरम्यान त्यांना फिर्यादीचा घरी जाण्याचा मार्ग आणी वेळ निश्‍चीतपणे कळाली होती. त्यानूसार त्यांनी कात्रज तलाव ते राजस सोसायटी दमऱ्यान ट्रॅफ रचला. फिर्यादी दुचाकीवरुन येत असतानाच यातील एकाच्या दुचाकीने त्याला धडक देत खाली पाडले. अपघाताचा बनाव करत इतरही साथीदार त्या ठिकाणी आले. यानंतर आरोपीने फिर्यादीवर कोयत आणी लाकडी दांडक्‍याने डोक्‍यात व हातावर सपासप वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तेथे नागरिकांची गर्दी जमू लागल्याने आरोपींनी पळ काढला.
* आरोपी पळून जाणार होते गोव्यात *
दरम्यान आरोपी गुन्हा केल्यानंतर नवले ब्रीजच्या खालुन गाडी पकडून गोवा येथे जाणा असल्याची खबर पोलीस कर्मचारी राहुल तांबे आणी सचिन पवार यांना मिळाली. त्यांनी खातरजमा केल्यानंतर इतर सहकाऱ्यांच्या मदतीने तीघाही आरोपींना अटक केली. त्यांना पोलिसी खाक्‍या दाखवताच गुन्हा कबुल केला. सुनिल राठोड याच्यावर उत्तमनगर , वारजे माळवाडी, पौड येथे मारहाण, चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे तब्बल 11 गुन्हे दाखल आहेत. त्याला उत्तमनगर पोलिसांनी तडीपार केले आहे. तर प्रतिक नलावडे याच्याविरुध्द उत्तमनगर पोलीस ठाण्यात जबरी चोरी व मारामारीचे गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत कुंवर, पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भुषण कोते, पोलीस कर्मचारी कृष्णा बढे, कुंदन शिंदे, सर्फराज देशमुख , राहुल तांबे, सचिन पवार, गणेश चिंचकर, अभिजीत रत्नपारखी, महेश मंडलीक, अभिजीत जाधव यांच्या पथकाने केली.  

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here