गाई चोरणारी टोळी टेंपो सोडून पळाली

शिक्रापूर-पाबळ (ता.शिरुर) येथील गणेशनगर वस्तीवर गायी चोरणारी टोळी आली होती परंतु मालक गोठ्यावर पोहचल्याने टेंपो आणि चोरलेल्या तीन गायी टेंपोत तर, तीन गायी जाग्यावर सोडून पळून गेली. या टोळीने यासाठी चोरीचा टेम्पो वापरल्याने निष्पन्न झाले आहे. याबाबत संतोष गेनबा पानसरे (रा. गणेशनगर, पाबळ, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला.
शिरुर तालुक्‍यातील तळेगाव ढमढेरे, केंदूर येथून गाय, बैल चोरीला गेल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यामुळे शिरुर तालुक्‍यात जनावरे चोरणारी टोळी सक्रीय असल्याचे उघड झाले आहे. पाबळ येथील गणेशनगर वस्तीवर संतोष गेणबा पानसरे हे रहाण्यास आहेत. तेथेच त्यांची शेती आणि जनावरांचा गोठा आहे. शनिवारी पहाटे एकच्या सुमारास पानसरे हे शेतातील टोमॅटो पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. त्यानंतर ते परतत असताना गोठ्याजवळ कुत्र्यांच्या भुकण्याचा आवाज आल्याने ते गोठ्याजवळ गेले असता तिन ते चार चोरटे गोठ्यातील तीन गायी चोरुन नेताना दिसले. त्यामुळे पानसरे यांनी आरडाओरडा करत त्यांचा पाठलाग केला असता ते डोंगराच्या दिशेने पळून गेले. त्यावेळी काही नागरिक त्यांचा पाठलाग करत असताना चोरीच्या गायी वाहतुकीसाठी चोरट्यांनी आणलेला एक (एमएच 12 एफसी 6349) हा आयशर टेम्पो हा जवळच लावला होता. हा टेम्पो चोरट्यांनी जाग्यावरच सोडून पळ काढला. यावेळी पाहिले असता या पानसरे यांच्या चोरलेल्या दुसऱ्या तीन गायी असल्याचे आढळून आले.
याबाबत संतोष गेनबा पानसरे फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला. तर पोलिसांनी केलेल्या तपासात आयशर टेंपो हा लोणी काळभोर (ता. हवेली) येथील मोहण राजाराम काळभोर यांचा असल्याची माहिती पुढे आली आहे. तर, हा टेम्पो चोरीला गेल्याची तक्रार लोणी काळभोर येथे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याचा पुढील तपास पोलीस निरिक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सोमनाथ दिवटे हे करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)