गतविजेत्या पुरुष हॉकी संघाचे आव्हान संपुष्टात

Jakarta: Indian hockey team look on after being defeated by Malaysian team in sudden death by 7-6, in the semifinal match at the 18th Asian Games 2018, in Jakarta, Indonesia on Thursday, Aug 30, 2018. (PTI Photo/Vijay Verma) (PTI8_30_2018_000220A)

मलेशियाविरुद्ध सडन डेथमध्ये पराभव 
जकार्ता – मलेशियाविरुद्धच्या उपान्त्य लढतीत निर्धारित वेळेत अखेरच्या क्षणापर्यंत आघाडी घेतल्यावरही सडन डेथमध्ये पराभव पत्करल्यामुळे गतविजेत्या भारतीय पुरुष हॉकी संघाचे आशियाई हॉकी स्पर्धेतील आव्हान आज संपुष्टात आले. निर्धारित वेळेअखेर 2-2 अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूट-आऊटमध्येही बरोबरी झाल्यावर मलेशियाने सडन डेथमध्ये 7-6 अशी बाजी मारली.

साखळी स्पर्धेत आपल्यापेक्षा कमी दर्जाच्या प्रतिस्पर्ध्यांवर एकूण तब्ल 76 गोल लगावणाऱ्या भारतीय संघाने मलेशियाविरुद्ध निराशाजनक कामगिरी केली. संपूर्ण स्पर्धेत भारतीय बचावफळीची खऱ्या अर्थाने कसोटी लागली नव्हती. आज तशी वेळ आल्यावर बचावफळीने सपशेल निराशा केली व परिणामी भारताला पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश करण्याच्या भारताच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

निर्धारित वेळेत भारताला मिळालेल्या सहा पेनल्टी कॉर्नरपैकी हरमनप्रीतने 33 व्या मिनिटाला, तसेच वरुण कुमारने 40व्या मिनिटाला गोल करताना भारताला आघाडी मिळवून दिली होती. मलेशियाच्या फैझल सारीने 24 व्या मिनिटाला केलेल्या गोलनंतरही भारताची आघाडी कायम होती. परंतु राझी रहीमने 59व्या मिनिटाला भारतीय बचावफळीच्या चुकीचा फायदा घेत मलेशियाला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर भारताला वर्चस्व घेण्याची संधी मिळाली नाही.

पेनल्टी शूट-आऊटमध्येही भारतीय खेळाडूंनी अक्षम्य चुका केल्या. केवळ आकाशदीप सिंग आणि हरमनप्रीत सिंग यांनाच लक्ष्यवेध करता आला. तसेच भारतीय कर्णधार श्रीजेशने तब्बल तीन गोल रोखून कमाल केली होती. परंतु एसव्ही सुनीलने दोनदा तर दिलप्रीत सिंगने एकदा चूक करताना मलेशियाला विजय मिळवून देण्यात हातभार लावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)