गणेशोत्सव साजरा करा बिनधास्त!

गणेशोत्सव मंडळांना दिलासा


यंदा कागदपत्रे जमा केल्यानंतर पुढील वर्षी पुन्हा कागदपत्रे देण्याची आवश्‍यकता नाही


परवानगीचे अर्ज करण्याकरिता 5 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई – गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वच मंडळांना पालिकेचा ऑनलाईन परवाना घ्यावा लागतो. त्यासाठी आवश्‍यक ती कागदपत्रेही जमा करावी लागतात. ही परवानगी देताना अनेक वादविवाद होतात. पण आता ही कटकट कायमची मिटणार आहे. कारण यावर्षी आवश्‍यक सर्व कागदपत्रे जमा केल्यानंतर व ऑनलाईन माहिती भरल्यानंतर पुढील वर्षी पुन्हा कागदपत्रे देण्याची आवश्‍यकता भासणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आले आहे. त्यामुळे पुढील वर्षांपासून बिनधास्त गणेशोत्सव साजरा करता येणार आहे.

गणेशोत्सवाच्या आयोजनासंदर्भात आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात प्रशासन व समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. या बैठकीला उद्योग मंत्री सुभाष देसाई, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, बृहन्मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, आमदार आशिष शेलार, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुख्यमंत्री म्हणाले, मुंबईतील गणेशोत्सव हा जागतिक आकर्षणाचे केंद्र आहे. येथील गणेशोत्सव पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक येत असतात. त्यामुळे हा अतिशय उत्सव आनंदात साजरा होण्यासाठी व गणेश मंडळाच्या समस्या सोडविण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून प्रशासन व गणेश मंडळांनी उत्तम समन्वय राखावा. पोलीस व प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य ती अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले.

मंडपाच्या परवानगीचे अर्ज करण्याकरिता 5 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांवरील गणेशोत्सव साजरा करण्यावरून दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबत गठीत करण्यात आलेल्या उपसमितीला गुन्हे मागे घेण्याबात सांगण्यात येईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

तसेच यावर्षी अर्ज करताना त्यासोबत सादर केलेली कागदपत्रे डिजिटल पध्दतीने संग्राह्य करण्यात येतील. त्यामुळे मंडळांना पुन्हा ही कागदपत्रे दरवर्षी सादर करावी लागणार नाहीत. मंडळांना सद्य स्थितीमध्ये वेगवेगळ्या सहा परवानग्या घ्याव्या लागतात. त्या एकाच ठिकाणी एकाच अर्जात मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)