गडचिरोलीमध्ये सुरक्षा दलांचे मोठे यश; 14 नक्षली टिपले

गडचिरोली – नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांनी धडक कारवाई करून 14 नक्षली टिपले आहेत. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत सी 60 कमांडो आणि महाराष्ट्र पोलीस यांनी ही कारवाई केली. गेल्या तीनचार वर्षातील या सर्वात मोठ्या कारवाईत 14 नक्षली मारले गेले आहेत. रविवारी सकाळी केलेल्या या कारवाईत मारल्या गेलेल्या नक्षलींमध्ये साईनाथ आणि सिनू या वरिष्ठ कमांडरांचा आणि दोन महिला नक्षलींचा समावेश आहे. सुरक्षा दलांची कारवाई अजूनही चालू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कसनूर भागात नक्षली कमांडरांच्या हालचाली चालू असल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. सध्या तेंदू पानांचा मोसम आहे. तेंदू पानांचा मोसम म्हणजे नक्षलींच्या वसुलीचा मोसम. या काळात ठेकेदारांकडून वसुली करण्यासाठी नक्षली येतात. वसुलीतून मिळणाऱ्या पैशातूनच त्यांना आपल्या कारवाया चालू ठेवायच्या असतात. मिळालेल्या माहितीप्रमाणे भामरागड तालुक्‍यातील ताडगाव जंगलात नक्षली लपून बसलेल्या जागेवर सुरक्षा दलांनी छापा घातला. छापा घातल्यवर नक्षलवाद्यांनी सुरू केलेल्या गोळीबाराला सुरक्षा दलांनी दिलेल्या प्रत्युत्तरात हे 14 दहशतवादी मारले गेले आहेत.

दोनच दिवसांपूर्वी याच ठिकाणी नक्षलवाद्यांबरोबर चकमकीत सीआरपीएफचे सहायक उपनिरीक्षक अनिल कुमार मौर्य शहीद झाले होते. अनिलकुमार वैद्य यांच्या मृत्युबद्दल उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ योगी यांनी दु:ख व्यक्त केले असून त्यांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत जाहीर केली आहे.गेल्या काही दिवसात सुरक्षा दलांनी नक्षलींविरुद्‌ध जोरदार कारवाई सुरू केलेली आहे. दरम्यान नक्षलवाई कारवाया कमी झालेल्या असून नक्षलग्रस्त भागही कमी झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे नक्षलग्रस्त 144 जिल्ह्यांपैकी 44 जिल्हे नक्षलमुक्त झाले आहेत, तर आठ नवीन जिल्हे नक्षलग्रस्त झाल्याची माहिते देण्यात आलेली आहे. सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या 35 वरून 30 झालेली आहे. बिहार आणि झारखंड मधील 5 जिल्हे अतिनक्षलग्रस्त श्रेणीतून मुक्त झाल्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)