गडचिरोलीमध्ये “आयईडी’च्या स्फोटात जवान जखमी 

गडचिरोली – लोकसभेच्या निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात उद्या विदर्भातील गडचिरोली आणि चिमूर या मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. मात्र या मतदानावर माओवाद्यांच्या हल्ल्याचे सावट निर्माण झाले आहे. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी घडवून आणलेल्या “आयईडी’च्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलिस दलाचा एक जवान जखमी झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटपेल्ली तालुक्‍यात गट्टा भागामध्ये “सीआरपीएफ’चे गस्तपथक तैनात असताना ही घटना घडली. या गस्त पथकाला हेलिकॉप्टरद्वारे या भागातून हलवण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाने गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना “हाय अलर्ट’ जाहीर केले आहे. कालच छत्तीसगडमधील गोंदिया जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी भाजपच्या वाहनांच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यामध्ये आमदार भीमा मंडवी यांच्यासह चार सुरक्षा रक्षक शहिद झाले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.