गडचिरोलीत ४८ तासात ३३ नक्षलवाद्यांचा खात्मा; पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी

संग्रहित छायाचित्र.

गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या विरोधातील भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे ऑपरेशन गडचिरोलीमध्ये झाले आहे. गडचिरोली पोलिसांनी गेल्या ४८ तासात ३३ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. सोमवारी गडचिरोलीच्या इंद्रावती नदीत ११ नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले असून त्यात चार महिलांचा समावेश आहे. या कारवाईनंतर भारतीय जवानांनी प्रसिद्ध गायिका सपना चौधरीच्या गाण्यावर ताल धरला.

सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांदरम्यान रविवारी आणि सोमवारी जोरदार चकमक उडाली होती. रविवारच्या कारवाईत सुरक्षा दलाने १६ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. तर सोमवारी केलेल्या कारवाईत आणखी सहा नक्षलवाद्यांना ठार मारले. आज गडचिरोलीच्या जंगलात सर्च ऑपरेशन करत असताना इंद्रावती नदीत ११ नक्षलवाद्यांचे मृतदेह वाहत आल्याचे दिसून आले. ही कारवाई जिमालगट्टा परिसरातील राजाराम खांदला जंगलात झाली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)