गडचिरोलीत “शिवशाही’ला अपघात, एकाचा मृत्यू 

गडचिरोली – शिवशाही बसच्या अपघाताचे सत्र सुरुच असून गडचिरोलीत अहेरी-हैदराबाद बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला शिवशाही बसने धडक दिली.
हा अपघात शुक्रवारी सकाळी अहेरीवरुन हैदराबादला जाणाऱ्या शिवशाही बसला झाला असून रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला शिवशाही बसने धडक दिली. यात बसमधील एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून बस चालकही गंभीर जखमी झाला आहे. अपघातात नेमके किती जण जखमी झाले आहे, याचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)