गंगा नदी 2020 पर्यंत पवित्र होणार – नितीन गडकरी

File photo....

गंगा शुद्धीकरणाचे काम 80 टक्के पूर्ण


उद्योजकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन

मुंबई – गंगा पुनरुज्जिवनाचा प्रकल्प करण्यासाठी पैशांची काही कमतरता नाही. गंगा शुध्दीकरणाचे काम हाती घेतल्यानंतर आता ते 70 ते 80 टक्के मार्चपर्यंत पूर्ण झाले आहे. येत्या 2020च्या मार्चपर्यंत संपूर्ण शुध्द आणि पवित्र गंगा आपल्याला नव्या पिढीसाठी देता येणार आहे, असे केंद्रीय जहाजबांधणी आणि रस्ते विकास तथा नदी विकास आणि गंगा शुध्दीकरण प्रकल्पाचे मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

आयएमसीच्या वालचंद हिराचंद सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आयएमसीच्या वतीने या प्रकल्पाला 25 लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला. नितीन गडकरी म्हणाले, गंगा शुध्दीकरण हे सरकारचे काम नाही, तर ही लोकचळवळ बनली आहे. त्यामुळे शाळा महाविद्यालयातून आम्ही आता गंगा मित्र तयार करत आहोत. याकामात किमान एक कोटी जनतेने श्रध्दने योगदान द्यावे आणि हा प्रकल्प लोकांच्या कायम स्मरणात राहावा आणि त्यांना गंगामाईची सेवा केल्याचे समाधान मिळावे असा सरकारचा हेतू आहे, असे गडकरी म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वेस्ट टू वेल्थ असा हा प्रकल्प असून त्यासाठी पैसा ही अडचण नाही. त्यामुळे ज्याला जितके आर्थिक योगदान द्यावे असे वाटत असेल त्याचे अगदी 21 रूपये देखील स्विकारण्याचे सरकारने ठरविले आहे. गंगा शुध्द करताना त्यातून निघणाऱ्या मिथेन आणि कार्बनच्या माध्यमातून बस चालविता येतील. तर गंगेत सोडल्या जाणाऱ्या विषारी पाण्यावर प्रक्रिया करून ते नागपूरच्या धर्तीवर बाजूच्या 22 वीज प्रकल्पांना विकून कोट्यवधी रूपयांचे उत्पन्न सरकारला मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

पर्यटनाला देखील चालना
गंगा आणि तिच्या उपनद्यांमधून जलवाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे. त्यातूनही म्यानमार आणि बांगलादेशपर्यंत वाहतूक सुरू केली जात आहे. यासाठी 60 वॉटर पोर्ट देखील उभारले जात आहेत. याशिवाय पर्यटनाच्या व्यवसायाला देखील यातून चालना मिळणार आहे. त्यातून लाखो नवे रोजगार देखील मिळणार आहेत. याशिवाय गंगा प्रवाह जेथे जातो त्या गंगोत्री पासून चारधाम जोडणाऱ्या महामार्गाचे जाळे तयार करण्यात आल्याने आता बाराही महिने चारधाम यात्रा करता येणार आहे, अशी माहितीही गडकरी यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)