खोलीत सीसीटीव्ही बसवण्याची मीराबाई चानूची मागणी

संग्रहित छायाचित्र.....

नवी दिल्ली – भारताची विश्‍वविजेती तसेच राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक पटकावणारी भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानूने भारतीय क्रीडा मंत्रालयाकडे आपल्या खोलीत सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केली असल्याची माहिती वेटलिफ्टिंग महासंघाने दिली आहे.

मीराबाई चानू ही गेल्या चार वर्षात 45 वेळा उत्तेजक सेवन चाचणीला सामोरी गेली असून सर्व वेळा ती निर्दोष सुटली आहे. सध्या ती आगामी आशियाई स्पर्धेसाठी सराव करीत आहे. त्याचबरोबर तिला संशय आहे की यावेळी आपल्या अन्नात तसेच इतर गोष्टीत भेसळ करून आपल्याला डोप उत्तेजक सेवन चाचणीत अडकवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यामुळे तिने आपल्या खोलीत, तसेच तसेच मेस व इतर ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याची विनंती केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मीराबाईची ही मागणी मान्य करतानाच वेटलिफ्टिंग महासंघाने म्हटले आहे की, आम्ही यापूर्वीच क्रीडा मंत्रालयाकडे ही मागणी केली असून यात प्रशिक्षण केंद्र, भोजनगृह, तसेच खेळाडूंचा बाहेरील व्यक्‍तींशी संबंध येऊ शकेल अशा सर्व ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावा असा आग्रह धरला आहे. परंतु क्रीडा मंत्रालयाने याबाबत काही हालचाल केलेली नाही.

त्याच बरोबर वेटलिफ्टिंग महासंघाचे अध्यक्ष सहदेव यादव या विषयासंबंधी म्हणाले की, आम्ही क्रीडा मंत्रालयाकडे पतियाळातील राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण संस्था येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय शिबिरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली आहे, जेणे करून आम्हाला सर्व खेळाडूंवर लक्ष ठेवता येईल. आम्हाला आमच्या एकाही खेळाडूच्या बाबतीत उत्तेजक सेवनाची तक्रार नको आहे.

त्याच बरोबर मीराबाईबद्दल बोलताना ते म्हणाले की, कोणीही तिच्या अन्नात अथवा इतर खाद्यपदार्थांत करुन तिला अडकवण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे सीसीटीव्हीची गरज असून याबाबत क्रीडा मंत्रालयानेही मान्यता दिली आहे. पुढच्या महिन्यात ते पतियाळातील राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षण संस्थेच्या सर्व विभागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील. सध्या बहुतेक खेळाडू हिमाचल प्रदेश येथील राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) शिलारू येथील केंद्रात प्रशिक्षण घेत आहेत. ते 3 जून रोजी पतियाळात परततील.

याबाबत राष्ट्रीय मुख्य प्रशिक्षक विजय शर्मा यांनी क्रीडा मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, यापूर्वी दोन खेळाडूंनी तक्रार करताना त्यांच्या अन्नामध्ये काही भेसळ करण्यात आल्याची शंका व्यक्‍त केली होती. तसेच पतियाला येथील शिबिराच्या ठिकाणचे वातावरण असुरक्षित असून तेथे कोणतीही बाहेरील व्यक्‍ती येऊन खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करू शकते. त्यामुळे सीसीटीव्हीची नितांत गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)