खोडशी येथून सात वर्षांचा मुलगा बेपत्ता

कराड, दि. 29 (प्रतिनिधी)- घरासमोर खेळत असलेला सात वर्षाचा मुलगा बेपत्ता झाल्याची घटना खोडशी (ता. कराड) येथे मंगळवारी (दि. 28) सकाळी 9 च्या सुमारास घडली. दरम्यान, अज्ञाताने मुलाला पळवून नेल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. शिवराज सुदाम भवर (वय 7), असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत सुदाम देविदास भवर यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुदाम भवर हे सेंट्रींगचे काम करतात. मंगळवारी सकाळी 9 वाजता ते कामावर गेले होते. त्यानंतर दहा वाजण्याच्या सुमारास पत्नी सखुबाई यांनी पती सुदाम पवार यांना फोन केला. आपला मुलगा शिवराज कुठे दिसत नाही. तुम्ही लवकर घरी या, असे पत्नीने सांगितले. त्यामुळे सुदाम पवार यांनी घरी जाऊन शिवराजचा शोध घेतला. लहान मुलांबरोबर खेळत असलेला शिवराज अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबीय गोंधळून गेले. त्यांनी मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्यादी शहर पोलीस ठाण्यात दिली. शिवराज याला स्पष्ट बोलता येत नाही. तसेच त्याला स्वतःचे नावही व्यवस्थित सांगता येत नाही. त्यामुळे घरासमोर खेळत असलेल्या शिवराजला कोणीतरी अज्ञाताने पळवून नेले असावे, असे सुदाम भवर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. शिवराजच्या अंगात निळा शर्ट, लाइनिंग हाफ पँट, हातात राखी बांधलेली आहे. चेहरा गोल असून नाक सरळ व रंग गोरा आहे. शिवराजची उंची साधारणतः तीन फूट असल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक भरत चंदनशिवे तपास करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)