खोडकिडीमुळे शेतकरी हवालदिल

टाकळीभान –टाकळीभान परिसरातील उसाच्या पिकाला खोड किड्यामुळे (उन्नी) मोठा धोका निर्माण झाला आहे. उन्नीचा प्रादुर्भाव उसाच्या पिकावर होऊ लागल्याने टाकळीभान परिसरातील शेतकरी हादरून गेला आहे. तालुका कृषी विभाग व साखर कारखान्यामार्फत या किडीविषयी मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून कारखान्याने 265 जातीचे उसाचे नवीन वाण आणले आहे. त्यावरही पांढरा मावा त्या रोगाने काही काळ थैमान घातले होते; परंतु त्यातून सावरताना जात बदलून आता 8005, 10001, 86032 असे वाण आणले. त्यावर वेगवेगळी प्रक्रिया करून उसाचे पीक उभे केले; परंतु महावितरणकडून वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने उसाला उसाला वेळेवर पाणी देता येत नाही. रानडुकरांच्या त्रासामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. उन्नीसारख्या रोगाचा प्रादुर्भाव या परिसरातील उसाच्या पिकांना होऊ लागला आहे. ही कीड प्रथमदर्शनी लक्षात येत नाही. उसाची पाने पिवळी पडू लागली, तर जादा पाणी अथवा इतर रोगाने ऊस पिवळा पडू लागला आहे, की काय असा संशय शेतकऱ्यांना येऊ लागतो. प्रत्यक्षात उसाच्या बेटाखाली उन्नीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्याचे लक्षात आले.
उन्नी पडत आहे, हे बहुतेक शेतकऱ्यांना माहीतदेखील नाही. जिज्ञासू शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. ज्या ठिकाणी ठिबक सिंचनाचे पाणी आहे, अशा शेतीतील ऊस वाचू शकतो; परंतु बाकी शेतकऱ्यांचे काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. उसाच्या पिकावर शेतकरी मोठा आर्थिक व्यवहार करीत असतो; परंतु या वर्षी उन्नी किडीने उसावर हल्ला केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. —-

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)