खोटा प्रचार रोखण्यासाठी व्हॉटस्‌ऍपचे फिचर

नवी दिल्ली: निवडणुकांत खोट्या बातम्यांचा प्रसार टाळण्यासाठी व्हॉट्‌सऍपने टिपलाइन ही सुविधा उपलब्ध करून दिली. तिच्या आधारे मजकुराची सत्यता व विश्‍शवासार्हता व्हॉट्‌सऍप वापरकर्त्यांना तपासता येईल. प्रोटो या भारतीय स्टार्टअप कंपनीने ही टिपलाइन तयार केली आहे. निवडणूक काळात पसरविल्या जाणाऱ्या अफवा, खोटी माहिती टिपलाइनद्वारे संकलित केली जाईल. आलेल्या बातम्या, माहितीबाबत शंका आल्यास युजर्स त्याची सत्यता तपासण्यासाठी एका क्रमांकावर पाठवू शकतील.

प्रोटो कंपनीच्या सेंटरमार्फत तिची सत्यता युजर्सला कळवली जाईल. तूर्त इंग्रजी, हिंदी, तेलुगू, बंगाली, मल्याळम या भाषांतच ही सुविधा वापरता येईल. खोटी माहिती देणारी छायाचित्रे, व्हिडीओ लिंक, मजकूर यांची छाननी टिपलाइनद्वारे करता येईल. लोकसभा निवडणुकांमध्ये पसरविली जाणारी खोटी माहिती तात्काळ टिपलाइनला मिळावी, यासाठी प्रोटोने काही संस्थांचे सहकार्य मागितले आहे. निवडणुकांत मतदारांना प्रभाव पाडण्यासाठी अफवा वा खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न सोशल मीडियातून झाल्यास संबंधित कंपन्यांवर कडक कारवाईचा इशारा केंद्र सरकारने दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.