खेळाडूंनी अपेक्षांची पुर्तता केली – रवी शास्त्री 

File photo
नॉटिंगहॅम: लागोपाठ दोन पराभवानंतर संघातील खेळाडूंनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केल्यानंतर खेळाडूंनी त्याला अगदी उचित प्रतिसाद दिला. अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिली. तसेच भारताने इंग्लंडवर तिसऱ्या कसोटीत 203 धावांनी मिळविलेला विजय हा आपल्या चार वर्षांच्या प्रशिक्षकपदाच्या काळातील सर्वाधिक सफाईदार विजय होता, अशेही त्यांनी यावेळी सांगतात.
यावेळी पुढे बोलताना शास्त्री म्हणाले की, पहिल्या कसोटीत इंग्लंडकडून आम्हाला निसटता पराभव स्वीकारावा लागल्याने मी निराश झालो. दुसऱ्या कसोटीत लॉर्डसवर आमचा धुव्वा उडाला त्यामुळे आम्हाला काहीतरी सिद्ध करून दाखवायचे होते. तुम्ही या सगळ्याची जबाबदारी स्वीकारा, असे मी त्यांना म्हटल्यावर त्यांनी त्याला अगदी अचूक प्रतिसाद दिला. आणि या सामन्यात आम्ही तिन्ही आघाड्यांवर यशस्वी ठरलो त्याचा प्रत्यय आम्हाला मिळालेल्या विजयातून मिळाला आहे.
तसेच विराट कोहली, अजिंक्‍य रहाणे चेतेश्‍वर पूजारा आणि हार्दिक पांड्यायांच्या कामगीरीचे विशेष कौतूक करताना शास्त्री म्हणाले की, पांड्याने आजच्या सामन्यात आम्ही त्याला एक अष्टपैलू खेळाडू म्हणुन संघात का निवडत आहोत हे दाखवून दिले आहे. त्याच बरोबर अजिंक्‍य आणि पूजारा यांनी भारतीय संघाची मधली फळी किती मजबूत आहे हे या सामन्यात दाखवून दिले आहे. तर कर्णधार विराट कोहलीने गेल्या तीन सामन्यांमध्ये 440 धावांचा रतीब लावून तो जगातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे दाखवून दिले आहे.
एक प्रशिक्षक म्हणून मी त्यापेक्षा अधिक अपेक्षा करू शकत नव्हतो. पण मला त्यांचा अभिमान आहे. ते ज्या पद्धतीने या आव्हानांपुढे उभे राहिले, संघर्ष केला आणि विजय मिळविला त्याचे कौतुक व्हायला हवे, असेही शास्त्री म्हणाले. गेली चार वर्षे मी भारतीय संघाच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. या चार वर्षात भारतीय संघाने परदेशात मिलवलेल्या विजयांचा विचार करता हा विजय सर्वात सफाईदार आणि सर्वोत्तम विजय आहे.
त्याच बरोबर गोलंदाजीतील चमकदार कामगिरीबद्दल शास्त्री यांनी भारत अरुण यांना श्रेय दिले. अरुण यांनी जी भूमिका निभावली, त्याचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. त्याच बरोबर शस्त्रीयांनी बूमराहचेही कौतुक केले. त्याची अनुपस्थिती आम्हाला का जाणवली हे त्याने आपल्या कामगीरीतून सर्वांना दाखवून दिले आहे. लोकांना वाटत होते की, तो केवळ एकदिवसीय सामन्यांसाठीचाच गोलंदाज आहे. त्यामुळे जेव्हा त्याची दक्षिण आफ्रिकेसाठी निवड झाली, तेव्हा अनेकांना आश्‍चर्य वाटले. पण महिन्याभराच्या विश्रांतीनंतर परतल्यावर त्याने जबरदस्त कामगिरी केली आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)