खेड तालुका गटशिक्षणाधिकारी नाईकडे : कुरुळी केंद्राची परिषद उत्साहात

चिंबळी- विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण परिषदेचा निश्‍चितपणे फायदा होणार असल्याचे मत खेड तालुक्‍याचे गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी व्यक्‍त केले.
विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण व शिक्षकांच्या विचारांचे आदानप्रदान होण्यासाठी यावर्षीपासून प्रत्येक महिन्यात एक शिक्षण परिषद आयोजन करण्याबाबत लोणी काळभोर येथील जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था व जिल्हा परिषदेने ठरवले आहे. त्यानुसार कुरुळी (ता. खेड) केंद्राची शिक्षण परिषद केंद्र प्रमुख हिरामण कुसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व खेड तालुक्‍याचे गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांच्या उपस्थितीत शाळा चाकण नंबर 2 येथे दोन सत्रात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, सरस्वती पूजन करुन शिक्षण परिषदेची सुरुवात करण्यात आली. यामध्ये प्रथम सत्रात, निलेश जगताप, निर्मला खेडकर व सुखदेव मुंगसे यांनी शिक्षकांना शिष्यवृत्ती मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शिष्यवृत्ती व नवोदय मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान नाईकडे यांच्या हस्ते करण्यात आला. द्वितीय सत्रात विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी काय उपक्रम राबविता येईल, तसेच शिक्षकांच्या विविध समस्या याविषयी चर्चा करण्यात येऊन त्याविषयी मार्गदर्शन नाईकडे व केंद्र प्रमुख हिरामण कुसाळकर यांनी केले. शिक्षण परिषदेसाठी चाकण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण नाणेकर व मधुकर सातव यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम वाटेकर यांनी तर दत्तात्रय शिवले यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)