खेडमधील 15 हजार 915 कुटुंबाना “आयुष्यमान’

राजगुरूनगर- एक लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या खेड तालुक्‍यातील 15 हजार 915 कुटुंबाला आयुष्यमान भारत या केंद्राच्या योजनेचा लाभ मिळणार आहे. एका कुटुंबाला 5 लाख रुपये विमा संरक्षण मिळणार असून नामांकित रुग्णालयात या कुटुंबातील व्यक्तींना उपचार घेता येणार आहेत. ही योजना सर्वसामान्य नागरिकांना फायद्याची ठरणार असून या योजनेचा लाभ देण्यासाठी गावपातळीवरील ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, आशा कार्यकर्ती, आरोग्यसहाय्यक, आरोग्य सेवक यांना जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबत कार्यशाळा घेवून त्यांना प्रशिक्षित केले जाणार असून त्याद्वारे गावातील कुटुंबाला मदत दिली जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात येणार असून 21 मार्च 2018 रोजी या योजनेअला केंद्राचा मान्यता मिळाली आहे. या योजनेत देशभरातील 10 कोटी पेक्षा जास्त नागरिकांना याचा लाभ दिला जाणार असून खेड तालुक्‍यात शासकीय सर्वेक्षणानुसार 15 हजार 915 कुटुंबे शासकीय सर्वेक्षणात पात्र ठरली आहेत. पात्र कुटुंबातील व्यक्तीचे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, कुटुंबाची माहिती संकलित करून ती ऑनलाईन पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे या कुटुंबाने दिलेल्या मोबाईल क्रमांक पुढील काळात बदलता येणार नाही कारण लाभ देताना मोबाईलवर ओटीपी क्रमांक येणार असल्याने आता मोबाईल क्रमांक न बदलण्याचे शासनाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत राजगुरुनगर येथे नुकतीच ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, आशा कार्यकर्ती आरोग्यसहाय्यक आरोग्य सेवक यांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश गोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी या योजनेबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
सन 2011 मध्ये झालेल्या सर्वेक्षनानुसार कुटुंबाची माहिती शासनाकडे उपलब्ध आहे. त्या अंतर्गत हि योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी कुटुंबातील नागरिकांकडे आधार कार्ड असणे आवश्‍यक आहे. हेआधार कार्ड सरकारी योजनेच्या साईटवर लिंक करण्यात येणार आहे. प्रत्येक कुटुंबाला आधार आयडी देण्यात येणार आहे. आधार कार्ड आणि ओळख पत्र लिंक केले जाणार आहे. याबरोबरच सबंधित व्यक्तीचे बॅंकेत खाते असणे महत्त्वाचे आहे. बॅंक खाते आधार कार्डला लिंक असणे आवश्‍यक आहे. या व्यतिरिक्त रेशनकार्ड, मतदान कार्ड, जन्माचा दाखला, शाळेचा दाखला जमा करणे गरजेचे आहे. या योजनेद्वारे गरीब आणि गरजवंत कुटुंबातील आजारी व्यक्तीला अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

  • सरकार 50 टक्के रक्कम देणार
    ही एक प्रकारची विमा पॉलीसी आहे. तिचा अधिकच हिस्सा सरकार देणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी वर्षाला 1100 ते 1200 रुपये हप्ता भरावा लागणार आहे. विमा मात्र संपूर्ण कुटुंबाला मिळणार आहे. ही केंद्र सरकारची योजना असून ती तत्काळ सुरु करण्यात आली आहे. यासाठी सरकार 50 टक्के रक्कम देणार आहे केंद्र सरकारने यासाठी 5 ते 6 हजार करोड निधी उपलब्ध केला आहे. देशातील दीड लाख सर्व सुविधा असलेली हॉस्पिटले समाविष्ट करण्यात आली असून कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • केंद्र सरकारच्या माध्यमातून आयुष्यमान भारत योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. तालुक्‍यात ती प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. खेड तालुक्‍यातून या योजनेसाठी 191 महसुली गावांतून 15 हजार 915 लाभार्थी निवडण्यात आले आहेत. त्यांना या योजनेची माहिती देण्यासाठी गावपातळीवर ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, आशा कार्यकर्ती आरोग्यसहाय्यक आरोग्यसेवक यांच्या माध्यमातून माहिती देवून आवश्‍यक कागदपत्रे जमा करून ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे. सोमवारी (दि. 30) विशेष ग्रामसभा घेवून लाभार्त्यांना माहिती दिली जाणार असून सोमवारी तालुक्‍यात आयुष्यमान भारत दिवस साजरा केला जाणार आहे.
    -डॉ. सुरेश गोरे, वैद्यकीय अधिकारी, खेड तालुका

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)