खेडमधील रिपाइंचे पदाधिकारी पक्षीय पातळीवर

मंत्री रामदास आठवलेंच्या हस्ते नवनियुक्‍तांचा सत्कार

राजगुरूनगर- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते नवनियुक्‍त पदाधिकाऱ्यांची निवड करुन नुकताच सत्कार करण्यात आला. खेड तालुक्‍यातील निवडण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांना पक्षीय पातळीवर संधी देण्यात आली.

मुंबईत झालेल्या पक्षीय बैठकीत या निवड करण्यात आल्या. यावेळी राज्यातील अनेक कार्यकर्त्यांनी आठवले यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला राष्ट्रीय अध्यक्षा सीमा आठवले, व्यापारी आघाडी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पोपट घनवट, सचिव सचिन वाघमारे, अर्चना वाघमारे, संगिता नाईकरे, सामाजिक कार्यकर्ते बाबा हजारे, युसुफ शेख आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते. खेड तालुक्‍यातील निवड झालेल्या पदाधिकारी यांचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.

  • खेड तालुक्‍यातील नियुक्‍त केलेले कार्यकर्ते
    व्यापारी आघाडी महाराष्ट्र राज्य महिला सचिव : शुभांगी शिंदे-शेख शिरोली (राजगुरूनगर), पश्‍चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष : नियती शिंदे (आळंदी), राज्य संघटक : माणिक पोळ, पुणे जिल्हा अध्यक्ष : ऋषिकेश बोत्रे, महिला जिल्हा उपाध्यक्ष : उषा कांबळे, आळंदी महिला शहर अध्यक्ष : देवकी कडेकर, उपाध्यक्ष : कल्पना मोझे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.