खेडच्या पश्‍चिम भागात टॅंकर सुरू

संग्रहित छायाचित्र

पाणीसाठे आटले ः नागरिकांना हातपंपांवर रात्री जागून काढून काढण्याची वेळ

खेड -गतवर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला असला तरी पावसाने सप्टेंबरमध्येच सुट्टी घेतल्याने जलाशयांमध्ये येणारा पाण्याचा प्रवाह लवकरच बंद झाला. यानंतर पाण्याचा विसर्ग चालूच राहिला, त्यामुळे पाण्याचे साठे दरवर्षीपेक्षा जास्त प्रमाणात रिकामे होत आहेत. पाण्याचे साठे मर्यादित स्वरुपात असल्याने यावर्षी मे महिन्यात या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती; परंतु दरवर्षीचा पाणी टंचाईचा ग्रामपंचायतींना अनुभव असल्याने अगोदरच ठराव दिले व पाणीपुरवठा विभाग यांच्या तात्काळ कारवाईने टॅंकर सुरू झाल्याने पाणी टंचाईच्या झळांची तीव्रता कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

टेकवडी येथील सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत चार मृत सर्प आढळून आल्याने पाणी दूषित झाले असून या गावातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अगोदरच महावितरणच्या अनियमित भारनियमनामुळे हैराण झालेल्या नागरिकांची पाणीटंचाई सत्वपरीक्षा घेत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या गावात एक हातपंप असल्याने संपूर्ण गाव यावर अवलंबून असल्याने पाणी कमी प्रमाणात मिळत आहे. नागरिक या हातपंपांवर रात्रीच्या रात्री जागून काढत आहेत.

वांद्रे, आंभू, आखतुली, गडद, या गावांमधील पाणीपुरवठा यंत्रणा सुरू आहे; परंतु वारंवारच्या भारनियमनामुळे त्या नियमित कधीतरी चालू होत असल्याने या योजनांची नसून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. आंबोलीला आंभू येथील पाझर तलावातून झिरपणारे पाणी सायफन पद्धतीने नेले असल्याने पाण्याचा व्यवस्थित पुरवठा होत आहे. भामा आसखेड धरणातून आणखी काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग झाला तर गाबरवाडी, कोळीये, वाघू, टेकवडी येथील पाणी पुरवठा यंत्रणा बंद होईल कासारी, अनावळे, पाळू, शिवे, वहागाव, अहिरे, पाईट, करंजविहीरे, वाकी ही गावे धरणाच्या अगदी जवळ असल्याने पाणी टंचाईचा सामना कमी प्रमाणात करावा लागणार आहे.

एकंदरीत पाण्याची घटलेली भूजलपातळी यामुळे विहिरी कोरड्या होण्याचे प्रमाण वाढणार असून भामा आसखेड धरणातील पाण्याचा होणारा विसर्ग व जंगलातील कोरडे झालेले वनबंधारे यामुळे यावर्षी वन्य पशु पक्षी, पाळीव प्राणी याच्याबरोबरच मानवी वस्तीला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईचा सामंना करावा लागत आहे.

धरणालगतच्या गावांमध्येही टंचाई
पाईट परिसरात भामा आसखेड धरण असले तरीही धरणातून खूप मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला असल्याने भलवडी पासून विऱ्हाम, आंबोली, आंभू, खरवली, कोहिंडे, आखतुली, कान्हेवाडी, वेल्हावळे, वाघू, टेकवडी इत्यादी गावांची नदीपात्रे कोरडी पडली. भूजलपातळी अतिशय खालावली आहे, त्यामुळे विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे जंगली पशु-पक्षांबरोबरच पाळीव प्राण्यांनासुद्धा पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)