खून प्रकरणी सराईताला पोलीस कोठडी

पुणे- पंढरपुर येथील नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणात एका सराईताची 1 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी आर. आर. भाळगट यांनी हा आदेश दिला आहे.
शाहरुख अकबर शेख (रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे सराईतीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने त्याला मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर शुक्रवारी (27 जुलै) पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीची दोन पिस्तुल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहे. पंढरपुरातील नगरसेवक संदीप पवार यांचा 4 महिन्यांपूर्वी पूर्ववैमनस्यातून खून झाला होता. खून प्रकरणात शेखच्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून शेख पसार झाला होता. बाणेरनजीक मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर तो पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती दरोडा प्रतिबंधक पथकातील पोलीस नाईक शैलेश सुर्वे यांना मिळाली. पोलिसांनी तेथे सापळा लावला. शेख याच्याकडे असलेल्या पिशवीची झडती घेण्यात आली. पिशवीत दोन पिस्तुल अणि दोन काडतुसे सापडली. शेख याच्यावर दरोडा, जबरी चोरी, अपहरणसारखे 8 गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणाचा पुढील तपासासाठी शेख याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील एस. ए. क्षीरसागर यांनी केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)