खून प्रकरणात पाच जणांना पोलीस कोठडी

पुणे – बांधकाम साईटवरील सुरक्षारक्षकाच्या डोक्‍यात दगड घालून आणि कोयत्याने वार करून खून केल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. न्यायालयाने त्यांना 3 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
विकास अनिल जाधव (वय 22), महेश विनायक चव्हाण (वय 19), दयानंद भिमराव सेताफराम (वय 22), आदित्य दिलीप खुडे (वय 19) आणि योगेश राजु लव्हाळे (वय 19, सर्व रा. कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जीवनलाल रामसुरिस्त मुस्तकील (वय 63, रा. वारजे, मुळ रा. बरवा, जि. उत्तरप्रदेश) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत सचिन कांतिलाल सोनार (वय 31, रा. मांजरी) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 12 जून 2018 रोजी मुंबई-बेंगलोर महामार्गावरील कुणाल सोसायटीजवळ घडली.
मुस्तकील हे मुंबई बेंगलोर महामार्गालगत असलेल्या एका बांधकामाच्या साईटवर रात्रपाळी करत होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रकमध्ये झोपलेल्या व्यक्तीला लुटण्याच्या हेतून आरोपी त्या ठिकाणी आले. त्यावेळी मुस्तकील यांनी त्यांचा प्रतिकार केला. त्यावेळी आरोपींनी मुस्तकील यांच्या डोक्‍यात कोयत्याने वार करून त्यांचा खून केला, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पाच जणांना न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्यातील हत्यार जप्त करण्यासाठी, त्यांचा इतर कोणी साथीदार आहे का? याचा शोध घेण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील ज्ञानेश्‍वर मोरे यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने पाच जणांना कोठडी सुनावली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)