खून प्रकरणात एकाला मोक्का न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी

पुणे- पूर्ववैमनस्यातून गोळ्या घालून खून केल्याप्रकरणात एकाला मोक्का कायद्यानुसार अकलूज पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याला 3 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी दिला आहे.

दशरथ विठोबा माने (वय 33 रा. नवचारी, संग्रामनगर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणात प्रदीप पांडुरंग माने (वय 24, रा. चिकमहुद, ता. सांगोला. जि. सोलापूर), परमेश्‍वर ऊर्फ देवा नानासाहेब ऊर्फ नानासो जाधव (रा. कोळेगाव, ता. माळशिरस), रमेश विश्‍वनाथ धुळे (वय 28, रा. कर्नाटक), अतुल ऊर्फ भैय्या गोरख इंगळे (वय 27, रा. संग्रामनगर, ता. माळशिरस), राजू ऊर्फ राजकुमार मधुकर भोसले (वय 39), साजिद इब्राहिम सय्यद (वय 39, दोघेही, रा. अकलूज, ता. माळशिरस), सागर प्रताप मोहिते (रा. संग्रामनगर, ता. माळशिरस) आणि सचिन दामोदर एखतपुरे (रा. माळेवाडी, ता. माळशिरस) या 8 जणांवर या प्रकरणात गुन्हा दाखल आहे.

याबाबत अनिकेत जालिंदर उंबरे (वय 17, रा. जाधव वस्ती, बेडशिंगे, ता. इंदापूर, जि. पुणे) याने फिर्याद दिली आहे. ही घटना 29 डिसेंबर रोजी सकाळी 10.15 च्या सुमारास माळशिरस तालुक्‍यातील संग्रामनगर येथे घडली. नानासाहेब दिलीप आसबे (वय 32, रा.संग्रामवाडी, ता. माळशिरस) असे खून झालेल्यांचे नाव आहे. फिर्यादी हा नानासाहेब यांचा भाचा आहे. दोघे गप्पा मारत बसले होते. त्यावेळी तोंडाला मास्क बांधून दोन व्यक्ती तिथे आल्या. त्यांनी पूर्ववैमनस्यातून नानासाहेब आणि फिर्यादींवर गोळीबार केला.

नानासाहेब यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर फिर्यादी जखमी झाले. या प्रकरणात पोलिसांनी मोक्का कायद्यानुसार दशरथ याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी घटनेबाबत सखोल तपास करण्यासाठी दोघांना पोलीस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)