महाळुंगे इंगळे – मोटार सायकलला भरधाव अवजड कंटेनरची जोरदार ठोस बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार कामगार जागीच मृत्यू झाला. ही घटना खालुंब्रे (ता. खेड) येथे शनिवारी (दि. 22) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी कंटेनर चालकावर सदोष्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. सुदाम दादाभाऊ गावडे (वय 30, रा. इंदोरी, ता. मावळ) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर ज्ञानेश्व सुभाषराव गवळी (वय 34, रा. केळगाव, ता. खेड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे.कृष्णा भैरू जाधव (वय 33) यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.