खापरवाडी यात्रोत्सवात बैलगाडा शर्यत नाही

कायद्याचे उल्लंघन होऊ नये यासाठी घाटात पोलिसांचा बंदोबस्त

बेल्हे- न्यायालयाने घातलेल्या बंदीला बैलगाडा शौकीन मालकाकडून तडा जाऊ नये, यासाठी आळेफाटा पोलिसांनी खापरवाडी (ता. जुन्नर) येथे अंबाबाई देवीच्या यात्रोत्सवनिमित्त बैलगाडा शर्यतीच्या घाटात पोलीस व्हॅन उभी करून बंदोबस्त ठेवला.
खापरवाडी (ता. जुन्नर) येथे अंबाबाई देवीच्या यात्रोत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले नसतानाही आळेफाटा पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी बैलगाडा शर्यतीच्या घाटात पोलीस व्हॅन उभी करून पोलीस बंदोबस्त ठेवल्याने यात्रेकरूंमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान खापरवाडी (आळेफाटा) येथील श्री अंबाबाई देवीच्या वार्षिक यात्रोत्सवनिमित्ताने बैलगाडा शौकिनांनी बैलगाडा शर्यतीच्या घाटात बैलगाडा शर्यत करून न्यायालयाच्या बैलगाडा बंदीच्या आदेशाची पायमल्ली करू नये आणि कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत येऊ नये यासाठी आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टीवाय मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर हे काळजी घेत आहेत. मात्र, या पोलीस बंदोबस्तचा धसका आयोजकांनी घेतल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.