खराबवाडीतून ओडिशासाठी डिझेल रवाना

महाळुंगे इंगळे- फणी चक्रीवादळामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील ओडिशा भागात नागरिकांचे अतोनात हाल व मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातून त्यांना सावरण्यासाठी आणि तातडीची मदत मिळण्यासाठी खराबवाडी येथून तब्बल साडेचार लाख रुपये किमतीचे सहा हजार लिटर डिझेल ओडिशाकडे एका जीप गाडीमध्ये रवाना करण्यात आले.

भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील ओडिशा व अन्य भागात गेल्या चार दिवसांपूर्वी धडकलेल्या या फणी चक्रीवादळाने बऱ्याच भागांना जोरदार तडाखा दिला. त्यामुळे तेथील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. शालेय विद्यार्थ्यांपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वांनाच त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला. या जोरदार तडाख्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने अनेक नागरिकांचे संसार रस्त्यावर आले. त्यामुळे त्यांना दिलासा व तातडीची मदत मिळण्यासाठी या भागातून उद्योजक नितीन पाटील यांनी पुढाकार घेतला. इंधन अथवा डिझेलच्या माध्यमातून नागरिकांना त्याचा लाभ घेता यावा, यासाठी खराबवाडी येथील श्री स्वामी समर्थ ऑटो सेंटर, इंडियन पेट्रोल पंप व पुना विभागीय कार्यालय महाराष्ट्र स्टेट यांच्या सयुंक्‍त पुढाकारातून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. भारत सरकारने यासाठी पायलट प्रोजेक्‍टर घरपोच डिलेव्हरीसाठी एक अद्ययावत जीपगाडी बनविली होती. त्या गाडीच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ ऑटो सेंटरच्या वतीने डिझेलने भरलेली साडेचार लाख रुपये किमतीची व सहा हजार लिटरची गाडी ओडिशा भागात रवाना करण्यात आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.