खड्ड्यांमुळे अपघात वाढल्याची तक्रार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्‌डे पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे, प्रशासनाने लवकरात-लवकर खड्‌डे बुजवावेत,” अशी मागणी भिम संग्राम सामाजिक संघटनेने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण अष्टीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी, संघटनेचे अध्यक्ष राहुल वडमारे, सुरेंद्र जाधव, पंडित किर्वे, नसीर शेख, उमेश वाघमारे, आनंद साळवे, कविता जगताप आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वडमारे म्हणाले,””पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. शहरातील मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रात्रीच्या सुमारास अपघात होत आहेत. नागरिकांनी चांगल्या दर्जाचे रस्ते व पदपथ तयार करुन देणे महापालिकेचे काम आहे. पावसाळ्यात पडलेल्या खड्डयांमुळे अनेक वाहन चालकांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे, महापालिकेने नादुरुस्त रस्त्यांचा सर्व्हे करुन लवकरात-लवकर नव्याने रस्ते करणे आवश्‍यक आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)