खड्डे टाळण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचा चक्‍क लोकलने प्रवास!

मुंबई – संपूर्ण महाराष्ट्राला वीज पुरवठ्याचे नियोजन करणाऱ्या राज्य भार प्रेषण केंद्राची पाहणी आणि आढावा बैठक घेण्याच्या दृष्टीने ठाणे येथे जाण्यासाठी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुपारी सीएसएमटी ते मुलुंड असा लोकलचा प्रवास केला. हा प्रवास प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी होता, असे जरी त्यांचे म्हणणे असले तरी रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठीच हा फंडा करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

वाहनांची वाढती संख्या आणि पावसामुळे रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत आहे. कळवा येथे होणाऱ्या या बैठकीत जाण्यासाठी किमान दीड ते दोन तास रस्ते वाहतुकीने लागणार होते. त्याऐवजी लोकलने प्रवास करून बावनकुळे तासाभरात बैठकीच्या ठिकाणी पोहोचले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मुंबईच्या लोकल प्रवासाचा एक वेगळा अनुभव घेताना ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी लोकलमधील प्रवाशांशी विविध विषयांवर संवाद साधला. त्यांनी लोकलमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधून विचारपूस केली. तसेच लोकलच्या याच डब्यातून प्रवास करणारे व्यापारी, नोकरदार, वृध्द, फेरीवाले यांच्याशी चर्चा करत त्यांची विचारपूस केली. प्रवाशांना ऊर्जा मंत्री लोकल प्रवास करीत आहेत हे कळताच सीएसएमटी स्थानकावर प्रवाशांनी कुतुहलापोटी गर्दी केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)