खड्डा दाखवल्याने आदित्य ठाकरेंना हजार रुपये द्या

धनंजय मुंडे : चंद्रकांत पाटील यांच्यासह शिवसेनेवर साधला
मुंबई – “खड्डा दाखवा, बक्षीस मिळवा’ योजनेतील हजार रुपये आता मित्रपक्ष शिवसेना आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठवा, असा टोला विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला.

नाशिक दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांना गुरूवारी खड्ड्यांचा फटका बसला होता. आदित्य ठाकरे नाशिककडे जात असताना खड्ड्यांमुळे त्यांच्या रेंजरोव्हर गाडीचे टायर फुटले होते. ही घटना मुंबई-नाशिक रस्त्यावरील घोटीजवळील पाडळी गावात शुक्रवारी घडली होती. याचा संदर्भ देत धनंजय मुंडे यांनी ट्‌विटरवर चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेवर निशाणा साधला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी खड्ड्यांवरुन आता नवी डेडलाईन दिली आहे. डिसेंबर 2018 पर्यंत राज्यातील सर्व खड्डे बुजवले जातील, असा दावा त्यांनी केला आहे. ट्विटरद्वारे त्यांनी ही माहिती दिली. त्यासाठी 2017 च्या अर्थसंकल्पातील मंजूर कामे तातडीने सुरू करावीत, असा आदेशही त्यांनी दिला आहे. याशिवाय कंत्राटदारांना वेळमर्यादेत कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी प्रत्येक वर्षी खड्डे भरण्यासाठी डिसेंबर अखेरची डेडलाईन दिली होती. 2016 मध्ये 15 डिसेंबरपर्यंत खड्डे दाखवा हजार रुपये मिळवा मोहीम त्यांनी सुरु केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)