खड्डा चुकवावा तरी कोणता?

मंचर-आंबेगाव तालुक्‍यातील कळंब परिसरातील पुणे-नाशिक महामार्गावर मंचरच्या खिंडीपासून ते वर्पेमळा हद्दीपर्यंत रस्त्यावर मोठमोठे जीवघेणे खड्डे पडलेले आहेत. कोणता खड्डा चुकवावा हा यक्ष प्रश्न वाहनचालकांना पडत आहे. खड्ड्यांमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांना रस्त्यावरून वाहन चालवणे अतिशय जिकिरीचे आणि अवघड झाले आहे. पुणे नाशिक महामार्गावर पावलोपावली मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. रस्त्यावर पडलेल्या या जीवघेण्या खड्ड्‌यांमुळे एखाद्याचा जीव जाण्याची वेळ निर्माण झालेली आहे. कळंब येथील घोडनदीच्या पुलावर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहे. या पुलावरून वाहन चालवताना हादरे बसतात. या ठिकाणी रस्त्यावर संपूर्ण डांबरीकरण करणे गरजेचे आहे. तसेच पुलाच्या पुढील बाजूच्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. कळंबच्या मुख्य चौकात, युको बॅंकेच्या वळणाच्या अलीकडे, महानुभाव मळ्याजवळ, भवानी माता मंदिराजवळ, एकलहरे गावात या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. रात्री-अपरात्री वाहनचालकांना खड्डयांचा अंदाज न आल्यामुळे अपघात होऊन कित्येक नागरिकांना आपले हात पाय गमवावे लागले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने हे अपघात रोखण्यासाठी आणि लोकांचे होणारे हाल रोखण्यासाठी खड्डे बुजविणे गरजेचे आहे. याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेऊन पुणे-नाशिक महामार्गावर पडलेले खड्डे त्वरित बुजवावे. अशी मागणी आंबेगाव तालुक्‍याच्या पंचायत समितीच्या सभापती उषाताई कानडे, माजी सभापती वसंतराव भालेराव, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कानडे, भीमाशंकर कारखाना संचालक रमेश कानडे, सरपंच राजश्री भालेराव, उपसरपंच डॉ. सचिन भालेराव, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी भालेराव, विष्णु कानडे यांच्यासह ग्रामस्थ, नागरिक व रस्त्यावरून प्रवास करणारे वाहनचालक करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)