खडेश्‍वरी महाराज समाधीत विलीन

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील अवसरी फाटा-गोरक्षनाथ टेकडी येथील तपस्वी हटयोगी रविनाथजी उर्फ खडेश्‍वरी महाराज यांच्या समाधी सोहळ्यासाठी आज (रविवारी) महाराष्ट्रासह विविध राज्यातून भाविकांनी गर्दी केली होती. फुलांच्या पाकळ्या उधळुन त्यांना समाधीत विलीन करण्यात आले. त्यावेळी अनेकांना अश्रु आवरता आले नाही.
योगी रविनाथजी उर्फ खडेश्‍वरी महाराज यांच्या समाधी सोहळ्याच्या अगोदर पालखीद्वारे त्यांच्या पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर समाधी देण्यात आली. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि वारकरी संप्रदायाच्या भाविकांनी दर्शन घेतले. ह.भ.प.पांडुरंग महाराज येवले यांनी योंगी रविनाथजी महाराज यांच्या जीवन पटाची माहिती दिली. दरम्यान, खडेश्‍वरी महाराज यांच्या निधनानिमित्त मंगळवारी (दि. 31) शोकसभा होणार असून या शोक सभेला श्री महंत बालकनाथजी योगी गद्दीमठ अस्थल बोहर, अखिल भारत वर्षीय बाराह के महंत योंगी कृष्णनाथजी, आठराह के महंत योंगी सेवानाथजी, त्रंबकेश्‍वर गादीचे महंत पीरयोगी गणेशनाथजी यांच्यासह देशभरातील नाथपंथीय साधु उपस्थित राहणार आहे.त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)