खडेश्‍वरी महाजांच्या सेवाभावी वृत्तीची जपणूक करावी

मंचर- योगी रविनाथजी ऊर्फ खडेश्‍वरी महाराज यांच्या निधनामुळे समाजाची फार मोठी हानी झाली. त्यांच्या सेवाभावाची जपणूक करण्याची गरज आहे, असे सांगून महंत योगी बालकनाथजी यांनी रविनाथजी ऊर्फ खडेश्‍वरी महाराज यांनी डोंगरदऱ्या झाडा-झुडपांमध्ये तपस्या केली. त्यानंतर तेथे नंदनवन झाले. त्यांच्या समाजकार्याची कीर्ती देशभर आहे. या शब्दांत योगी रविनाथजी ऊर्फ खडेश्‍वरी महाराज यांच्या कार्याचा गौरव पीठाधीश्‍वर महंत बालकनाथजी महाराज यांनी मगळवारी (दि. 31) केला.
योगी रविनाथजी ऊर्फ खडेश्‍वरी महाराज यांच्या निधनानिमित्त गोरक्षनाथ टेकडी-अवसरी फाटा (ता. आंबेगाव) येथे शोकसभा आयोजित केली होती, त्यावेळी देशभरातून आलेल्या भाविकांना उपदेश करताना योगी बालकनाथजी महाराज बोलत होते. यावेळी हरियाणा येथील पीर राजनाथजी, 12 के महंत योगी कृष्णनाथजी , 18 के योगी सेवानाथजी, महंत योगी सुरजनाथजी, पीर गणेशनाथजी, महंत शंकरनाथजी, पीर पारसनाथजी, महंत तेजनाथजी, पीर शामनाथजी, पीर नारायणनाथजी, पीर अजेयनाथजी, महंत योगी किशननाथजी, भाजपचे तालुकाध्यक्ष संजय थोरात, उद्योजक गोविंद खिलारी, विजय आढारी, संतोष बाणखेले, ज्ञानेश्‍वर गावडे, उद्योजक मिलींद खुडे, निळकंठ खुडे, योगेश थोरात यांसह भाविकभक्त उपस्थित होते. यावेळी महंत योगी शंकरनाथजी, पीर गणेशनाथजी महाराज, महंत योगी सुरजनाथजी महाराज, ऍड. सुनील बांगर यांची योगी रविनाथजी ऊर्फ खडेश्‍वरी महाराज यांच्या कार्याला उजाळा देणारी भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश भोर यांनी, तर आभार डी. के.वळसे पाटील यांनी मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)