खडतर परिस्थितीवर मात करून मिळविलेले यश अलौकीक

मंचर, दि. 30 (प्रतिनिधी) – खडतर परिस्थितीत अभ्यास करून मिळवलेले यश अलौकीक आहे.गुरूने शिष्याला दिलेली शिकवण महत्वाची आहे. आवश्‍यक सुविधांचा सुयोग्य वापर हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य प्राचार्य उत्तम आवारी यांनी केले.
मंचर (ता. आंबेगाव) येथील महात्मा गांधी विद्यालयात विद्यार्थी, पालक, शिक्षक मेळाव्याचे आयोजन केले होते. इयत्ता आठवीसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या वर्षभराच्या तयारीसाठी पालकांना आवाहन करताना प्राचार्य आवारी बोलत होते. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या त्रिवेणी संगमातून शिष्यवृत्तीच्या यशाचे फळ मिळणार असून त्यासाठी पालकांनी आपल्या पाल्याला वर्तन स्वातंत्र्य द्यावे. आधुनिक सुविधांचा योग्य, अयोग्य विचार करूनच त्या पाल्यास पुरवाव्यात. वेळेचे नियोजन करावे, असेही पुढे त्यांनी सांगितले.
उपस्थित पालक आणि प्राचार्य आवारी यांच्या हस्ते कर्मवीर प्रतिमेस अभिवादन करून मेळाव्याचा प्रारंभ झाला. शिष्यवृत्तीच्या तयारीसाठी मासिक चाचणी, जादा तासिका, तज्ञांची व्याख्याने, परीक्षा पद्धती याविषयी पर्यवेक्षक पंढरीनाथ बारवे यांनी माहिती दिली. पालक मनोगतात रोहिणी सोमवंशी यांनी पालकांच्या वतीने शिष्यवृत्ती तयारीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. दिलीप कुंभार यांनी प्रास्ताविकात मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला. पर्यवेक्षक पंढरीनाथ बारवे यांनी उपस्थित शिक्षक, पालकांचे आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)