खटाव परिसरात जखमी घुबडास जीवदान

खटाव – खटाव परिसरात जखमी अवस्थेत पडलेल्या अति दुर्मिळ प्रजातीच्या घुबडाला शहाजीराजे महाविद्यालयाच्या प्राध्यपकांनी जीवदान दिले. प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. रामचंद्र पवार, प्रा. बी. बी. राठोड व प्रा. तुषार बागल यांनी जखमी अवस्थेत सापडलेल्या घुबडावर 2 दिवस उपचार करुन सोडून देण्यात आले आहे. घुबड या पक्षाविषयी समाजात आजही उलट सुलट चर्चा होत असतात.

वास्तविक पाहता घुबड हा पक्षी शेतकऱ्याचा खऱ्या अर्थाने मित्र समजला जातो. कारण त्याचे मुख्य खाद्य शेतातील उंदिर,घुशी, सरडे असेच असते. अशा पक्षांमुळे शेतीची राखण होतेच शिवाय निसर्गाचा ही समतोल राखला जाण्यास मदतच होत असते. काळाच्या ओघात काही मानव निर्मित व नैसर्गिक कारणामुळे ही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या दुर्मिळ प्रजातीस वाचविण्यास हातभार लावल्यामुळे शहाजीराजे महाविद्यालयाचे प्राचार्य संजय पाटील, डॉ. पी. डी. कुलकर्णी, प्रा. एम. आय. शेख, प्रा. जे. यु. चौथे, प्रा. ए. एम. येलपले, प्रा. जी. पी. साळवे, प्रा. जे. पी. कदम, प्रा. एस. एस. शिंदे, प्रा. टी. एस. कांबळे आदींसह प्राध्यापक, कर्मचारी वर्गाने त्यांचे अभिनंदन व कौतुक केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)