खटावमध्ये मंत्र्यांना ध्वजारोहन करू देणार नाही

मराठा समन्वय समितीचा एकमताने ठराव : वडुजला ठिय्या आंदोलन 

वडूज, दि. 30 (प्रतिनिधी) – मराठा समजाच्या मागण्या सरकारने तातडीने मान्य करून मराठा समजातील युवकांनावरील गुन्हे मागे घ्यावे अन्यथा येणाय्‌ा स्वातत्र्यंदिनी महाराष्टातील एकाही मंत्र्यांला ध्वजारोहन करू देणार नाही असा ईशारा देत वडुज येथे मराठा समाजाचा वतीने ठिय्या आंदोलन केले.
वडुज तहसीलदार कार्यालयासमोर मराठा समाज्यातील बांधवासह महिलांनी आपल्या मागण्यासाठी एक दिवसाचा ठिय्या केला. यावेळी एक मराठा लाख मराठा,”जय जिजाऊ जय शिवराय ” आरक्षण आमच्या बापाच नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देण्यात आल्या.
मराठा आरक्षणाबाबत सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, मराठा समाजातील आंदोलनकर्त्या युवकांनावर दाखल झालेले गुन्हे माघारी घ्यावेत. अन्यथा एक ऑगस्टला जेलभरो आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. त्यावरही सरकारला जाग न आल्यास महाराष्ट्रातील एकाही मंत्र्यांला स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहन करू दिले जाणार नाही, असा एकमुखाने ठराव घेण्यात आला.
यावेळी तहसिलदार सुशील बेल्हेकर व पोनि यशवंत शिर्के यांना निवेदन देण्यात आले. ठिय्याच्या ठिकाणी रंगराव पाटील यांचा पोवाडाचा कार्यक्रम झाला. दिवसभर ठिय्याच्या ठिकाणी विविध संघटना, राजकीय पक्षाचे पदाधिकारि यांनी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला. दरम्यान, नगरपंचायतीसह विविध संघटनांनी तसेच जैन समाज, मानवाधिकार संघटना यांच्या वतीने आंदोलनास पाठिंबा देण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)