खंडोबा मंदिराच्या ओवरीत सापडली 6 हजारांची जुनी नाणी

जेजुरी – महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून प्रचलित असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिराच्या गडकोट आवारातील एका खोलीची (ओवरीची) स्वच्छता करताना डेडस्टाकमध्ये एका पोत्यामध्ये 1, 2, 3, 5, 10, 20, 25 आणि 50 पैशांची नाणी आढळून आली आहेत. मोजदाद केली असता ते सुमारे 6 हजार रुपये असल्याचे समजते. विशेष म्हणजे यामध्ये काही तांब्याची व पितळेची नाणी होती.

मंगळवारी (दि. 19) मुख्य गडकोटातील एका खोलीची स्वच्छता करण्यात आली. त्यावेळी जुनी नाणी सापडली. आजच्या पिढीला या नाण्यांविषयी आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. कारण या नाण्यांचा धातू आजच्या काळात मूळ किंमती पेक्षा जास्त किंमतीचा आहे. 1, 2, 3, 5, 10 ते 20 पैशापर्यंतची नाणी अल्युमिनियम धातूची आहेत. 1, 2 व 3 पैशाचे नाणे 1979 साली चलनातून बंद झाली आहेत तर 5, 10, 20 पैशाचे नाणे 1996 साली चलनातून कालबाह्य झाली आहेत. 25 व 50 पैशांची नाणी तेरा वर्षांपूर्वी चलनातून बंद झाली असली तरी आजही दानपेटीमध्ये काही अंशी 25 व 50 पैशांची नाणी आढळून येतात.

Leave A Reply

Your email address will not be published.