खंडित वीजपुरवठ्याची नोटीस आता व्हॉट्‌सअॅपद्वारे

वीज नियामक आयोगाची मंजुरी

पुणे- थकबाकीदार ग्राहकांना वीज कनेक्‍शन तोडण्यापूर्वी आगाऊ लेखी नोटीस देणे बंधनकारक होते. बहुतांश ग्राहक अशा नोटीसा स्विकारत नसल्याने वीज कनेक्‍शन तोडताना अनेक वाद निर्माण होत. परंतु आता महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने डिजीटल नोटीस देऊन वीज कनेक्‍शन तोडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता थकबाकीदारांना व्हॉट्‌स अॅप, एसएमएस, ई-मेलमार्फत आगाऊ सूचना देऊन वीजपुरवठा खंडित करण्याचा मार्ग अधिक सोपा झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

12 सप्टेंबर 2018 रोजी वीज नियामक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार डिजीटल नोटीस ग्राह्य धरली आहे. त्यासाठी आयोगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या 11 जून 2018 रोजीच्या आदेशाचा आधार घेतला आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार डिजीटल नोटीसची पोहोच सहज मिळते. प्रशासकीय खर्च व मानवी क्रयशक्ती दोन्हीची बचत होते.

राज्यभरात महावितरणचे अडीच कोटी ग्राहक आहेत. त्यापैकी 2 कोटी 5 लाख ग्राहकांचे मोबाईल क्रमांक कंपनीकडे उपलब्ध आहेत. तर उर्वरित क्रमांकही लवकरच नोंदवले जातील. सर्व ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर मागील काही वर्षांपासून दरमहाचे वीजबिल, मीटर रिडींग, वीजबंदची पूर्वसूचना, स्मरण आदी माहिती एसएमएसद्वारे नि:शुल्क दिली जात आहे. आयोगाने वरील सर्व सेवांसाठी मोबाईल संदेश, ईमेल, व्हॉट्‌स अॅप आदी डिजीटल प्लॅटफॉर्म वापरणे कायदेशीर ठरविले आहे.

फेरजोडणी आकारात वाढ
वीजपुरवठा खंडित करणे व तो पुन्हा जोडणे यामध्ये कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती खर्ची पडते. त्यामुळे फेरजोडणी आकारात वाढ करण्याचा प्रस्ताव महावितरणने आयोगापुढे ठेवला होता. आयोगाने महावितरणचे म्हणणे ग्राह्य धरत सिंगल फेज फेरजोडणी आकार 50 रुपयांहून 100 रुपये, तर थ्री फेज जोडणी आकार 100 रुपयांहून 200 रुपये केला आहे. जेणेकरुन वीजबिल थकवणाऱ्यांना बिले वेळेत भरण्याची शिस्त लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)