खंडाळा येथे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

खंडाळा :शहरातील नागरिकांनी दुकाने बंद ठेवून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

खंडाळा, दि. 25 (प्रतिनिधी)- मराठा आरक्षण मागणीसाठी खंडाळा येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान मराठा समाज बांधवांनी महामार्गपासून तहसिल कार्यालयापर्यंत मोर्चा काढुन लहान मुलांच्या हस्ते मागणीचे निवेदन तहसिलदार विवेक जाधव यांना देण्यात आले.
सकल मराठा क्रांती ठोक मोर्चा खंडाळा तालुका यांच्यावतीने आज बंदची हाक देण्यात आली होती. प्रारंभी महामार्गानजीक असणाऱ्या भिमाशंकर मंदिरापासून मोर्चाला सुरूवात झाली. घोषणाबाजी करीत खंडाळा शहरातील मुख्य रस्त्याने तहसिल कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी होऊन , गोदावरी नदीत जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांना तहसिल कार्यालयासमोर श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी सरकारच्या वेळकाढूपणावर आंदोलकांनी टीकेची झोड उठवली. दरम्यान मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी तालुक्‍यात आज सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने दिवसभर उस्फुर्तपणे बंद ठेवली होती .पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील,पोलीस उपनिरीक्षक हणमंतराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बंदच्या काळात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)