खंडाळा घाटात दरडसत्र

मिडल लाईन ‘ब्लॉक’ : मुंबई-पुणे रेल्वेसेवा विस्कळीत

लोणावळा – मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे लोहमार्गादरम्यान असलेल्या खंडाळा घाटात दरड कोसळण्याचे सत्र रविवारी देखील सुरूच होते. खंडाळा रेल्वे स्टेशनच्या पुढे अमृतांजन पुलाजवळ शनिवारी (दि. 25) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास रेल्वेच्या अप आणि मिडल लाईनवर मोठी दरड कोसळल्याने लांब पल्ल्याच्या रेल्वेसेवेवर परिणाम झाला होता. ही दरड हटविण्याचे काम सुरू असतानाच रविवारी (दि. 26) दुपारी पुन्हा याच ठिकाणी दरड खाली आल्याने रेल्वेसेवा पुन्हा विस्कळीत झाली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाजवळ लोहमार्ग किलोमीटर क्रमांक 121 येथे लोहमार्गाच्या अप आणि मिडल लेनवर दरड कोसळली. या दरडीसोबत मोठमोठे दगड रेल्वे ट्रॅकवर आले. या घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत घटनेची पाहणी करत लोहमार्गावरील दरड युद्धपातळीवर हटविण्याचे काम सुरू केले. चार तासानंतर रात्री साडेबाराच्या वाजण्याच्या सुमारास अप लाईनवरील दगड बाजूला करून रेल्वेसेवा पुन्हा धीम्या गतीने पूर्ववत करण्यात आली.

दरम्यान मिडल लाईन तसेच या दोन्ही ट्रॅकच्या बाजुला दरडीसोबत आलेले दगड बाजुला करण्याचे काम सुमारे 300 कर्मचाऱ्यांच्या मदतीने रविवारी देखील सुरू ठेवण्यात आले होते. हे काम सुरू असतानाच दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान पुन्हा एकदा याच ठिकाणी एक दरड खाली ट्रॅकवर कोसळली. त्यामुळे पुन्हा एकदा रेल्वेसेवा बाधित झाली होती.

ही दरड बाजूला करण्याचे काम रेल्वेकडून युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. मात्र या दरम्यान भुसावळ एक्‍सप्रेस लोणावळा स्थानकात तट खंडाळा स्टेशनमध्ये चेन्नई एक्‍सप्रेस थांबविण्यात आली होती. मळवली स्टेशनमध्ये कर्जत शटल थांबवली, तर मळवली आणि कामशेत दरम्यान कुर्ला एक्‍सप्रेस काही काळ थांबवून धरण्यात आली होती. हा सर्व प्रकार सुरू असतानाच काही तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने लोणावळा-पुणे लोकल सेवा देखील काही काळ विस्कळीत झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)