क्षयरोग मुक्तीसाठी प्रत्येकाचे योगदान महत्वाचे – पोलीस अधीक्षक

सातारा दि.24 (प्रतिनिधी): आपल्या देशात दरवर्षी सुमारे दिड लाख लोकांचा मृत्यु हा क्षय रोगामुळे होत आहे. हे आपल्या सर्वांसमारे मोठे संकट आहे. या आजारावर शासकीय रुग्णालयात मोफत उपचार केले जातात, याची माहिती सर्वसमान्य नागरिकांना द्यावी व आपला देश, आपले राज्य व आपले गाव क्षयरोग मुक्त करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी केले.

24 मार्च जागतिक क्षयरोग दिननिमित्ताने आज येथील जिल्हा रुग्णालयात जनजागृती रॅलीचे व सायकल रॅलीचे आयोजन करण्यात होते. या रॅलीला मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्त केले. यावेळी तेजस्विनी सातपुते बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. राजेश गायकवाड, डॉ. सुधीर बक्षी, डॉ. क्रांती दयाळ, डॉ. राजेंद्र पवार, डॉ. जीवन लाहोटी आदी उपस्थित होते.

आपण सर्वजण जबाबदार नागरिक आहोत. कुठेही थुंकु नका, खोकताना तोंडाला रुमाल लावा यामुळे रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यास खूप मदत होईल. क्षयरोग रुग्णाला सामाजिक व मानसिक आधार द्या. आपण आपल्या देशातून पोलीओला हद्दपार केले आहे, अशा पद्धतीने क्षयरोगालाही हद्दपार करु, असा विश्वासही पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी शेवटी व्यक्त केला.

दरवर्षी जगभात 5 लाख व भारतात दिड लाख लोकांचा मृत्यु हा क्षयरोगामुळे होत आहे. क्षयरोगाचे संकट दूर करण्यासाठी प्रत्येकाने क्षयरोगाविषयी प्रचार व प्रसिद्धी केली पाहिजे. याचाच एक भाग म्हणून आज रॅली व सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. क्षयरोग रुग्णाला जिल्हा रुग्णालयात मोफत उपचार केले जातात. त्याच्या आहारासाठी प्रत्येक महिन्याला 500 रुपये भत्ता दिला जातो.

महाविद्यालया व विद्यालयात क्षयरोगाच्या जनजागृतीसाठी यापुढे कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे प्रास्ताविकात डॉ. राजेश गायकवाड यांनी सांगितले. यावेळी पोलीस अधीक्षकांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन काढण्यात आलेल्या रॅलीला आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, विविध महाविद्यालयांचे, विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.