क्रेडिट कार्डची माहिती हॅक करून 30 लाखांची फसवणूक

पिंपरी – एका व्यक्तीच्या क्रेडिट कार्डची माहिती हॅक करून 29 लाख 74 हजार 833 रुपये एवढी रक्कम विमानाच्या तिकीट बुकिंगसाठी वापरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत बॅंकेकडून पोलिसात फसवणुकीची तक्रार देण्यात आली आहे.

मिलिकअर्जुन परमेश्वर नंदर्गी (वय 40, रा. हिंजवडी) यांनी याबाबत बुधवारी (दि. 7) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 24 डिसेंबर 2020 रोजी ऑनलाइन माध्यमातून घडला आहे.

फिर्यादी नंदर्गी आयसीआयसीआय बॅंकेत डेप्युटी मॅनेजर आहेत. त्यांच्या बॅंकेचे ग्राहक अनिल शिवाजी घाडगे (रा. वाकड) यांच्या क्रेडिट कार्डची माहिती अज्ञात व्यक्तीने हॅक केली. त्या माहितीच्या आधारे अज्ञात व्यक्तीने विमानाचे तिकीट खरेदी केले. त्यासाठी त्याने 29 लाख 74 हजार 833 एवढी रक्कम वापरली. यामुळे बॅंकेचे ग्राहक आणि बॅंक अशी दोघांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.