क्रुडची आयात कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न

इंधनाचा अपव्यय रोखणार ; चालू खात्यावरील तूट रोखण्यासाठी उपाय शक्‍य

तेल उत्पादक देश क्रुडचा पुरवठा वाढविणार नाहीत

क्रुडची आयात अंशत: कमी करण्याचा प्रयत्न होणार असला तरी देशात इंधनाच्या पुरवठ्यावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. आयात कमी करण्यासाठी क्रुडचा राखीव साठा कमी करणे तसेच क्रुड आणि इंधनाची वेगात वाहतूक करणे या शक्‍यतेवर विचार केला जात आहे.
संजीव सिंह अध्यक्ष, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवी दिल्ली: आयात वाढल्यामुळे रुपयावर परिणाम होत असल्यामुळे आता सरकार क्रुडची आयात कमी करण्यावर गंभीरपणे विचार करीत असल्याचे बोलले जात आहे. आयात केलेले क्रुड फार काळ पडून राहणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे इंडियन आईल कार्पोरेशनचे अध्यक्ष संजीव सिंह यांनी सिांगतले. तसे केल्यास काही प्रमाणात परकीय चलन वाचेल असे सरकारला वाटते. सोन्याच्या आयातीवर आणखी निर्बंध आणण्याचा सरकारचा विचार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढतच चालले आहेत. त्यामुळे सामान्य लोकांचे अतोनात हाल होत आहेत. त्यातच आता खनिज तेल निर्यातदार देशांनी म्हणजे ओपेकने भारतात तेलाची निर्यात वाढवण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे पेट्रोलचा दर लवकरच शंभरी गाठेल, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव 82 डॉलर प्रतिबॅरलच्या वर गेला आहे. तसेच इराणकडूनही तेल निर्यात बंद होणार असल्याने तेलाच्या प्रतिबॅरलची किंमत 100 डॉलरच्या पलीकडे जाण्याची शक्‍यता आहे. रशियाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ओपेक देशांच्या बैठकीत इराणवर लादलेल्या निर्बंधांमुळे आम्ही कोणत्याही देशाला अधिकचे तेल निर्यात करणार नसल्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे इराणकडून तेल आयात करणाऱ्या देशांची एक प्रकारे कोंडी होण्याची शक्‍यता आहे. त्याचा भारतातही मोठा प्रभाव पडणार आहे. केंद्र सरकारनेही एक्‍साइज ड्युटी कमी करण्यास नकार दिल्यानं पेट्रोल आणि डिझेलचे दर घटण्याची शक्‍यता कमीच आहे.

सततच्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. मुंबईसोबतच राजधानी दिल्लीतही पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत. चालू आर्थिक वर्षात इंधनाचे दर चांगलेच भडकले आहेत. आतापर्यंत फक्त 29 मे ते 5 जुलैदरम्यान दरात घसरण झाली होती. त्यानंतर 6 जुलै ते 25 सप्टेंबरदरम्यान बहुतांश दिवस इंधनाचे दर वाढले. कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने देशांतर्गत इंधन महाग होत आहे. मात्र आता सरकारला यातून मार्ग काढावा लागणार असल्याचे बोलले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)