#क्रीडांगण: जय  बजरंग! 

अमित डोंगरे 
ऑलिम्पिक स्पर्धांची रंगीत तालीम समजली जाणारी आशियाई क्रीडा स्पर्धा भारतीय खेळाडूंनी चांगलीच यशस्वी केली आहे. बजरंग पुनिया, विनेश फोगट, राही सरनोबत आणि सौरभ चौधरी यांनी आपापल्या खेळात सुवर्णपदके पटकावत ऑलिम्पिकच्या आशा पल्लवीत केल्या आहेत.
जबरदस्त फॉर्मात असलेल्या बजरंग पुनियाने 18व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात पहिले सुवर्णपदक जमा करण्याचा मान मिळवला. रविवारी भारताने दोन पदके मिळवली. दुसरे पदक 10 मीटर एअर रायफलच्या मिश्रमध्ये अपूर्वी चंडेला आणि रवीकुमारने पटकावले. या जोडीने ब्रॉंझपदक मिळवले. मात्र, सर्वांधिक निराशा केली ती ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशीलकुमारने. त्याला पहिल्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला.
हरियाणाच्या 24 वर्षीय बजरंगने 65 किलो फ्रीस्टाइलमध्ये आपल्या सर्व कुस्त्या जिंकल्या. त्याने तांत्रिकदृष्टया आपल्या सर्वच प्रतिस्पर्ध्यांपेक्षा सरस खेळ करून दाखविला. त्याने सुरुवातीला उझबेकिस्तानच्या सिरोजिद्दीन खासानोवला 13-3 असे नमविले. यानंतर ताजिकिस्तानच्या फायझिएव अब्दुलकोसिमचे आव्हान 12-2 असे परतवून लावले. मंगोलियाच्या एन. बातमाग्नाई बॅटचूलूचाही त्याच्यासमोर निभाव लागला नाही. बजरंगने बातमाग्नाईवर 10-0 ने सहज मात करून अंतिम फेरी गाठली. अंतिम लढत चुरशीची झाली. अखेर जपानच्या ताकातानी दाईचिचे आव्हान 11-8 असे परतवून लावत बजरंगने जकार्तामध्ये तिरंगा फडकविला. ऑलिम्पिक पदक विजेता योगेश्‍वर दत्त हा बजरंगचा मेन्टॉर आहे. बजरंगने आता आशियाई सुवर्णपदक विजेते करतारसिंग (1978, 1986), सतपालसिंग (1982), राजिंदरसिंग (1978), चंडी राम (1970) आणि मारुती माने (1962) यांच्या पंक्तीत स्थान मिळवले.
सुशीलचे अपयश 
रविवारी भारताचे पाच कुस्तीपटूंकडून मोठ्या अपेक्षा होत्या. यात सुशीलकुमार (74 किलो) संदीप तोमर (57 किलो), मौसम खत्री (97 किलो) आणि पवनकुमार (86 किलो) यांचाही समावेश होता. मात्र, बजरंग वगळता या साऱ्यांनी निराशा केली. या स्पर्धेत सुशील कुमारकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, आपल्या दर्जाचा खेळ करण्यात त्याला अपयश आले, इतका मोठा अनुभव असूनही तो अपयशी ठरला.
बजरंगच्या यशात अनेक गोष्टींचा वाटा आहे. त्याने अनेक देशांच्या खेळाडूंचे सामन्यांचे व्हिडीओ पाहून सराव केला. त्याचा त्याला डावपेच आखण्यासाठी खूप उपयोग झाला. बजरंग जागतिक क्रमवारीत 65 किलो वजनीगटात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे, त्याचे हे या वर्षातील विविध स्पर्धेत मिळून चौथे सुवर्णपदक ठरले. त्याने राष्ट्रकुल, त्बिलिसी ग्रांप्रि आणि यासर दोगू आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवले आहे. 2014 मध्ये त्याने ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धा, इंचिऑन आशियाई स्पर्धा अस्ताना आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेत रौप्यपदक मिळवले आहे. बुडापेस्ट जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत 60 किलो गटात ब्रॉंझपदक आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेत एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन ब्रॉंझपदकांची कमाई केली तसेच राष्ट्रकुल अजिंक्‍यपद स्पर्धेत दोन सुवर्णपदके मिळविली.
विनेश फोगटने ‘दंगल’ जिंकली भारताच्या विनेश फोगट हिने आशियाई क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. आशियाई स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती भारताची पहिलीच महिला कुस्तीगीर ठरली.
महिलांच्या 50 किलो गटात विनेश सुरुवातीपासूनच पदकाची प्रबळ दावेदार मानली जात होती. तिने अंतिम फेरीत जपानच्या युकी इरीला 6-2 असे नमविले. 23 वर्षीय हरियानाच्या विनेशची ही कारकिर्दीतील सर्वात मोठी कामगिरी ठरली. विशेष म्हणजे फोगट कुटुंबातील आणखी एका मुलीने ‘आखाडा’ गाजविला. विनेशने 2016च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली होती. मात्र, गुडघ्याच्या दुखापतीमुळे तिला पराभव पत्करावा लागला. मात्र, यावेळी ‘एशियाड’मध्ये विनेश पूर्ण तयारीनिशी उतरली होती. तिने सुरुवातीपासूनच इरीवर वर्चस्व राखले. पहिल्या फेरीनंतर तिने 4-0 अशी आघाडी घेऊन विजयाचा पाया रचला होता. यानंतर दुसऱ्या फेरीत इरीने तिला चांगली लढत दिली. मात्र, आघाडी गमावणार नाही, याची काळजी तिने धेतली. या फेरीत दोघींनी 2-2 गुण मिळवले आणि विनेशने ही लढत 6-2 अशी जिंकली. तत्पूर्वी, विनेशने पहिल्या लढतीत चीनच्या सन याननला 8-2 असे सहज नमविले. यानंतर उपांत्यपूर्व फेरीत कोरियाच्या हायुंगजू किमवर मात केली. यानंतर उपांत्य फेरीचा अडथळा पार करण्यासाठी तिला अवघे 75 सेकंद पुरेसे ठरले. तिने उझबेकिस्तानच्या याखशिमुरातोवा दाउलेटबिकवर सहज विजय मिळवला.
साक्षी, पूजाकडून निराशा 
महिलांच्या 62 किलो फ्रीस्टाइलमध्ये साक्षी मलिककडून अधिक अपेक्षा होती. तिने पहिल्या फेरीत थायलंडच्या स्रीसोबत सलिनीवर 10-0ने मात केली. यानंतर उपांत्यपूर्व फेरीत तिने कझाकस्तानच्या कासायमोवा अयाउलमवर 10-0ने मात करून उपांत्य फेरी गाठली. मात्र, या फेरीत तिने आघाडी गमावली. किर्गिस्तानच्या टायनीबेकोवा असुलूने साक्षीचे आव्हान 9-7 असे परतवून लावले. सुरुवातीला साक्षी 4-0ने आघाडीवर होती. मात्र, नंतर तिने प्रतिस्पर्धीला सलग सहा गुण दिले. यानंतर दुसऱ्या फेरीत तिने पुन्हा 7-6 अशी आघाडी मिळवली होती. मात्र नंतर ब्रॉंझपदकाच्या लढतीत तिला कोरियाच्या रिम जॉंग सिमने 12-2ने नमविले. महिलांच्या 57 किलोत पिंकी धांडाला उपांत्य फेरीत कोरियाच्या जॉंगने तिला 10-0 ने नमविले. यानंतर तिला ब्रॉंझपदकही मिळवता आले नाही. जपानच्या साकागामी कात्सुकीने तिला 6-1ने पराभूत केले. यानंतर पिंकीला 53 किलो गटात पहिल्याच फेरीत मंगोलियाच्या सुमियाने पराभूत केले. सुमीत मलिकला पुरुषांच्या 125 किलो गटात पराभव पत्करावा लागला.
‘एशियाड’मध्ये महिलांच्या कुस्तीत प्रथमच 50 किलो गट ठेवण्यात आला आहे. महिलांमधील हा सर्वात कमी वजनीगट आहे. 2002 बुसान ते 2014 दरम्यानच्या एशियाडमध्ये 48 किलो गट होता. ‘एशियाड’मधील कुस्तीत भारताने अकरावे सुवर्णपदक पटकावले. विनेशच्या आधी एशियाडमधील कुस्तीत मारुती माने (1962), गणपतराव आंदळकर (1962), मालवा (1962), चंदगी राम (1970), राजिंदरसिंग (1978), सत्पालसिंग (1982), कर्तारसिंग (1978, 1986), योगेश्‍वर दत्त (2014), बजरंग पुनिया (2018) यांनी सुवर्णयश मिळविले होते. ‘एशियाड’मधील कुस्तीत महिलांमध्ये भारताचे पाचवे पदक ठरले. गेल्या इंचिऑन एशियाडमध्ये 48 कलो गटात विनेशला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले होते. यावेळी विनेशने सुवर्णयश मिळविले. यापूर्वी, 2006 दोहा एशियाडमध्ये अल्का तोमरने ब्रॉंझ, 2006 मध्येच गीतिका जाखडने रौप्य आणि 2014मध्ये इंचिऑनमध्ये गीतिकाने ब्रॉंझपदक मिळविले होते. सलग दोन आशियाई
स्पर्धेत पदक जिंकणारी विनेश पहिल
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)