कौटुंबिक न्यायालयात आता वकिलांच्या दोन संघटना

  नव्या संघटनेच्या अध्यक्षपदी ऍड. नियंता शहा


  तर जुन्या संघटनेच्या अध्यक्षपदी ऍड. वैशाली चांदणे

  पुणे – कौटुंबिक न्यायालयाचे नवीन इमारतीत स्थलांतर झाल्यानंतर दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या कार्यकारिणीसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत केवळ 288 वकील मतदार ग्राह्य धरले. तर बाकी वकील नियमावर बोट ठेवून डावलण्यात आले. त्यामुळे पुणे बार असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली ” फॅमिली कोर्ट ऍडव्होकेट्‌स असोसिएशन’ ची स्थापना मंगळवारी करण्यात आली. पुणे बार असोसिएशनचे 14 हजार वकिल या नव्या संघटनेचे सदस्य होऊ शकणार आहेत.
  फॅमिली कोर्टाच्या उद्घाटनाच्या श्रेयवादावरुन वकिलांच्या दोन संघटनांमध्ये ऑगस्ट 2017 मध्ये चांगलीच जुंपली होती. दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या कार्यकारिणीची नव्या इमारतील ही पहिली निवडणूक होती. मात्र यापूर्वी असलेल्या सदस्यांची संख्या आता वाढून पुणे बार असोसिएशनच्या सदस्यांना त्यात सदस्यत्व मिळावे अशी मागणी होती. यावरुन वाद सुरु झाले. तर दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या निवड़णुकीला एका वकिलाने न्यायालयात आव्हान दिल्यामुळे धर्मादाय आयुक्तांनी तीन वकिलांची समिती नेमली होती. यात नियमावर बोट ठेवून डावले गेल्यामुळे आणि 14 हजार वकिलांचा प्रश्‍न असल्यामुळे अखेर आणखी एक नवीन संघटना स्थापन करण्यात आली.
  पुणे बार असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली फॅमिली कोर्ट ऍडव्होकेट्‌स असोसिएशन’ ची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदी ऍड. नियंता शहा यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी ऍड. अभय सिरसाट आणि ऍड. सुप्रिया कोठारी यांची निवड करण्यात आली आहे. सचिवपदी ऍड. संदीपक फडके, सहसचिवपदी ऍड. गीतांजली कडते, खजिनदारपदी ऍड. राहूल सोनावणे, हिशोब तपासनीसपदी ऍड. माधूरी वैद्य यांची निवड करण्यात आली. तर सदस्यपदी ऍड. बाळासाहेब आमले, ऍड. हेरंब गानू, ऍड.रुशिराज वाळवेकर, ऍड. रविंद्र पवार, ऍड. भारती जागडे, ऍड. मतीन खान, ऍड. आनंद शेटे, ऍड.वासुदेव पवार यांची निवड करण्यात आली आहे.
  दरम्यान, जुन्या फॅमिली कोर्टापासून कार्यरत असलेल्या दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनची 2018 – 19 ची निवडणूक मंगळवारी बिनविरोध पार पडली. या संस्थेच्या अध्यक्षपदी ऍड. वैशाली चांदणे, उपाध्यक्षपदी ऍड. प्रगती पाटील, ऍड. झाकीर मणियार यांची निवड करण्यात आली आहे. तर सचिवपदी ऍड. नीलेश फडतरे, सहसचिवपदी ऍड. अपर्णा राऊत, खजिनदार म्हणून विजय सरोदे, सदस्यपदी ऍड. मिनाक्षी डिंबळे, ऍड. ज्योती जाधव, ऍड. संतोष शिंदे, ऍड. सायली देशपांडे, ऍड. महेबुब शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
  या निवडणुकीसाठी धर्मादाय आयुक्तांनी तीन वकिलांची समिती नियुक्त केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ऍड. दिपक बारभाई, ऍड. संग्रामसिंह देसाई, ऍड. माधवी परदेशी यांचा समावेश होता.

  -Ads-
  दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)