विराट कोहली, मीराबाई चानू खेलरत्न पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना आज खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा पार पडला. विराट कोहली खेलरत्न पुरस्कार मिळवणारा तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी 1997 साली सचिन तेंडुलकर आणि 2007 साली महेंद्रसिंह धोनीला खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.

क्रीडा क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. दरवर्षी हॉकीचे जादूगार अशी ओळख असलेल्या मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी म्हणजेच 29 ऑगस्टरोजी या पुरस्कारांचं वितरण केलं जातं. मात्र यंदा आशियाई खेळांमुळे या सोहळ्याची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. त्याचबरोबर महाराष्ट्राची नेमबाज राही सरनोबतला यावेळी अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुरस्कारसोहळ्याआधी आज सकाळी मीराबाई चानूने ट्‌विटरवरुन खेलरत्न पुरस्कार मिळत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. कर्णम मल्लेश्वरी आणि कुंजराणी यांच्यानंतर खेलरत्न पुरस्कार मिळवणारी मीराबाई चानू ही तिसरी महिला वेटलिफ्टर ठरली आहे. याव्यतिरीक्त विविध क्रीडा प्रकारातील 20 खेळाडूंचा अर्जुन पुरस्कार देऊन गौरवण्यात आले ज्यात भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि टेबल टेनिसपटू मनिका बात्रा यांचा समावेश केला होता.

राष्ट्रपती भवनात विशेष समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या पुरस्कारांसाठी खेळाडूंची शिफारस करण्यात आली होती. क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. यावर्षीच्या विविध क्रीडा पुरस्कारांची 20 सप्टेंबर रोजी घोषणा करण्यात आली होती. आज त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदन करण्यता आले.

पुरस्काराचे स्वरुप –

साडे सात लाख रुपये रोख, पदक आणि प्रमाणपत्र असे राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे स्वरुप आहे. अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले. राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार विजेत्यांना चषक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. आंतर विद्यापीठ स्पर्धेत अव्वल कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आजाद चषक, दहा लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र देण्यात आले.

पुरस्कार विजेत्या खेळाडूंची यादी
खेलरत्न पुरस्कार- 1) विराट कोहली व मीराबाई चानू, अर्जुन पुरस्कार- 1) नीरज चोप्रा, 2) हिमा दास, 3) जिन्सन जॉन्सन, 4) स्मृती मंधाना, 5) सुमित, 6) मनप्रीत सिंग, 7) सविता पुनिया, 8) रोहन बोपण्णा, 9) सिक्‍की रेड्डी, 10) शुभंकर शर्मा, 11) सतीश कुमार, 12) रवी राठोड, 13) राही सरनोबत, 14) अंकुर मित्तल, 15) श्रेयसी सिंग, 16) मनिका बात्रा,17) जी. साथियन, 18) पूजा कादियन, 19) अंकुर धामा व 20) मनोज सरकार, र्दोणाचार्य पुरस्कार- सीए कुटाप्पा, विजय शर्मा, श्रीनिवास राव, सुखदेव सिंग पन्नू, क्‍लॅरेन्स लोबो, तारक सिन्हा, जीवनकुमार शर्मा व व्हीआर बीडू, ध्यानचंद पुरस्कार- सत्यदेव प्रसाद, भारतकुमार छेत्री, बॉबी ऍलॉयसियस व दादू चौगुले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)