कोविड सेंटरमध्ये काम करते म्हणून महिलेला मारहाण


पिंपरी –  टाकीतील पाणी संपले की काय हे पाहण्यासाठी छतावर जात असलेल्या महिलेला सहा जणांनी मिळून बेदम मारहाण केली. पीडित महिला कोविड सेंटरमध्ये काम करत असल्याच्या कारणावरून ही मारहाण करण्यात आली आहे.  संतोष कुंभार, गणेश कुंभार, छाया कुंभार, सोनम कुंभार, अश्विनी कुंभार, सुहास कुंभार (सर्व रा. अनंतनगर, पिंपळे गुरव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी महिला कोविड सेंटरमध्ये काम करत आहे. 2 मे रोजी त्या कामावरून घरी आल्यावर त्यांच्या घरात पाणी नव्हते. त्यामुळे छतावरील टाकीतील पाणी पाहण्यासाठी जात असताना आरोपी छाया हिने फिर्यादी यांना अडवत तू वर कशाला चाललीस. तू करोना रुग्णांच्या दवाखान्यात काम करतेस. तू वर येत जाऊ नकोस असे म्हणून फिर्यादी यांना छतावर जाऊ दिले नाही. फिर्यादी यांच्याशी गैरवर्तन केले. आरोपी संतोष याने फिर्यादी यांना काठीने मारहाण केली. आरोपी गणेश याने फिर्यादी यांच्याशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला.  या प्रकरणी पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.