कोळगावथडीच्या सरपंचपदी संगीता निंबाळकर

कोपरगाव – तालुक्‍यातील कोळगावथडीच्या सरपंचपदी संगीता विलास निंबाळकर यांची एकमताने नुकतीच निवड करण्यात आली. कोळगावथडीच्या सरपंच शामल लुटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर निंबाळकर यांची निवड करण्यात आली आहे.
निवडीनंतर झालेल्या सत्कार समारंभात निंबाळकर म्हणाल्या, “”आपल्यावर दाखविलेला विश्वास व टाकलेली जबाबदारी आपण समर्थपणे पार पाडू. कोळगावथडी गावाला आदर्श गाव करण्यासाठी सर्वाना सोबत घेऊ. युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळगावथडीच्या नागरिकांचे विकासाचे प्रश्न सोडवू.”
याप्रसंगी गंगाधर चव्हाण, गेणुजी शिंदे, बाबुराव निंबाळकर, बाळासाहेब निंबाळकर, भिकनराव निंबाळकर, माधवराव जाधव, गुलाबराव निंबाळकर, दत्तात्रय शितोळे, अरुण मुटकुळे, राजाराम निंबाळकर, विलास निंबाळकर, कैलास लुटे, अशोक चव्हाण, शिवाजी निंबाळकर, शामराव मेहेरखांब, खंडू लुटे, दिनकर वाकचौरे, बबनराव वाकचौरे, नंदू निंबाळकर, भाऊसाहेब लुटे, राजेंद्र लुटे, माधवराव मुटकुळे, हुसेन शेख, मच्छींद्र सोनवणे, निवृत्ती वाकचौरे, आप्पासाहेब काकड, शामल लुटे, उपसरपंच बंडू जाधव, सदस्य विठ्ठल जगताप, राजेंद्र गवळी, भास्कर मेहेरखांब, मनीषा बेंडकुळे, शकुंतला पंडोरे, शुभांगी राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून के आर वाघ व तलाठी जी. एम गरकल यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामविकास अधिकारी भानुदास दाभाडे यांनी सहकार्य केले. नवनिर्वाचित सरपंच संगीता निंबाळकर यांचे माजी आमदार अशोकराव काळे, युवा नेते आशुतोष काळे, प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्ष पुष्पाताई काळे, जिल्हा सहकारी बॅंकेच्या संचालक चैतालीताई काळे यांनी अभिनंदन केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)