कोल्हार येथे प्रवरा नदीपात्रच बनले कचरा डेपो

कोल्हार – राज्यात ग्रामस्वच्छता अभियानासाठी राज्य सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. देशभरातही स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. मात्र कोल्हार बुद्रुक येथील कचरा प्रवरा नदीपात्रात टाकण्यात येत असल्याने या नदीपात्रालाच कचरा डेपोचे स्वरूप आले आहे. एकीकडे देशात नमामी गंगेसारखा नदी स्वच्छता प्रकल्प सुरू आहे, तर कोल्हारला मात्र विपरित स्थिती असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतीस कचरा टाकण्यास जागा नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून हा कचरा प्रवरा नदीपात्रात टाकला जातो आहे. त्यामुळे नदीपात्राला कचरा डेपोचे स्वरूप आले आहे. अनेक वेळा हा कचरा येथे जाळला जातो. त्यामुळे दिवसदिवस धुराचे लोट त्यातून निघतात. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. तसेच प्लास्टिक जळाल्याने त्याची मोठी दुर्गंधी सुटत असल्याने ग्रामस्थांना श्‍वास घेणे मुश्‍किल होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एकीकडे देशाचे पंतप्रधान गंगा काठचा परिसर स्वच्छ करण्यासाठी योजना आखतात. देश स्वच्छ व्हावा, म्हणून ते स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता करतात. मात्र कोल्हार बुद्रुकमध्ये याच्या विपरित स्थिती दिसून येते. ज्याला वाटेल तेथे कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले दिसतात. प्रवरा नदी पात्रालगतच दशक्रिया विधीसाठी ओटा बांधलेला आहे. मात्र अनेक जण या ओट्यालगतच कचरा टाकत आहेत. त्यामुळे दशक्रिया विधीसाठी आलेल्यांना विधी होईपर्यंत नाक मुठीत धरून बसावे लागते. त्यामुळे नमामी गंगेसारखा उपक्रम राबवून प्रवरा नदीपात्र स्वच्छ करण्याची मागणी होत आहे.

आवर्तन काळात प्रवरा नदीपात्र दुथडी भरून वाहते. त्यामुळे हा कचरा वाहून जातो. मात्र या कचऱ्यामुळे पाणी दूषित होते. त्यामुळे पुढील गावांतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. त्यामुळे या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यावी, अशी मागणी होत आहे.गावची लोकसंख्या वाढत असल्याने कचऱ्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. ग्रामपंचायतीला कचरा टाकण्यासाठी जागाच नाही. गाव महामार्गाच्या कडेला असल्याने जागेच्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीस जागा घेणे अवाक्‍याबाहेर आहे. त्यामुळे कचरा डेपोसाठी एखाद्या संस्थेने किंवा दानशूर व्यक्तीने जागा द्यावी. जागा मिळाल्यास हा प्रश्‍न तातडीने सोडवू.

-रिना खर्डे,सरपंच, कोल्हार बुद्रुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)