कोल्हार येथील जुगार अड्ड्यावर छापा

राहाता -राहाता तालुक्‍यातील कोल्हार बु. येथे स्थानिक गुन्हे शाखेने जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी परजिल्ह्यातील व्यक्तींसह 41 जणांना ताब्यात घेतले. यावेळी 44 लाख 17 हजार 790 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई आज पहाटे स्थानिक गुन्हे शाखेने केली. या कारवाईमुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. 

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना रविवारी (दि.13) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कोल्हार बु. परिसरातील मुद्दसर शकील शेख व कय्यूम करीम शेख यांच्या इमारतीच्या टेरेसवर 25 ते 30 व्यक्ती तिरट नावाचा जुगार खेळत आहेत, अशी माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक पवार यांनी पथक तयार करुन संबंधित इमारतीला घेरले.

तर काही कर्मचाऱ्यांनी थेट टेरेस गाठले. तेव्हा पथकाला तेथे काही व्यक्ती जुगार खेळत असल्याचे आढळून आले. या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून 8 लाख 19 हजार 140 रुपये रोख व इतर मुद्देमाल, असा 44 लाख 17 हजार 790 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

यावेळी चितेन विजय वाघमारे (रा. पिंपळस, ता. राहाता), मुद्दत शकील शेख (रा. कोल्हार बु. ता. राहाता), सागर सवंत बेदाडे, अश्‍पाक जमीर शेख (रा. मनमाड, जि. नाशिक), दिलावर मन्सूर शेख, (रा. कोल्हार बु. ता. राहाता), आरबाज राजू पठाण (रा. राहाता), माहिद कय्यूम शेख (रा. कोल्हार बु. ता. राहाता), जुबेरखान निसारखान पठाण (रा. नाईकवाडपुरा, ता. संगमनेर), असिफ तस्लिम शेख (रा. कोल्हार बु. ता. राहाता), अर्शद रशीद मोमीन (रा. येवला, जि. नाशिक), वसंत लक्ष्मण वडे (रा. येवला. जि. नाशिक), अमित हरिभाऊ गाडेकर (रा. राहाता), लालू मारुती चौधरी (रा. अकोले) कय्यूम गुलाब पठाण (रा. विसापूर. ता श्रीगोंदा),

नवाब हुसेन शेख (रा. लोणी, ता. राहाता), जाहिद दिलावर सय्यद (अंबिकानगर, कोल्हार, ता. राहाता), सय्यद अली महम्मद (रा. वांबोरी, ता. राहुरी), सतशी हनुमांत वैष्णव (रा. अकोले) रवींद्र सुभाष चकोर (रा. माधवनगर, मनमाड), मुनावर सलीम शेख (रा. वांबोरी, ता. राहुरी), दीपक रामदास उंबरे (रा. येवला), परवेज शेख अब्दुल रहेमान (रा. मनमाड), अब्बास राजू शेख (रा. मनमाड), चॉंद इब्राहीम शेख (रा. कोल्हार बु. ता. राहाता), जयहिंद गोविंद माळी (रा. राहुरी बु), विलास दत्तात्रय चोथे (रा. वांबोरी),

सागर मदनलाला वर्मा (रा. बेलापूर बु, ता. श्रीरामपूर), गणेश विठ्ठल जेजूरकर (रा. शिर्डी ता. राहाता), इम्रान याकूब मोमीन (रा. मनमाड), शकील सलीम शेख (रा. अंबिकानगर, कोल्हार बु.) नजीर आजीज शेख (रा. राहुरी बु), संतोष बाबुराव चौधरी (रा. अकोले) शकील जब्बर शेख (रा. कोल्हार बु., ता. राहाता), संजय कांतिलाल पटेल (रा. कोल्हार बु., ता. राहाता), नुमान सत्तार शेख (रा. कोल्हार बु., ता. राहाता), संकलेन कय्यूम शेख (रा. कोल्हार बु., ता. राहाता), भाऊसाहेब रामराव चौधरी (रा. रुई, ता. राहाता),

सचिन बाळाराम पवार (रा. कोल्हार बु., ता. राहाता), अमोल भास्करराव वाघमारे (रा. विसापूर, ता. श्रीगोंदा), गणेश रंगनाथ सोमासे (रा. येवला), महेश अण्णा बुरकुल (रा. मनमाड), अशा 41 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

जिल्ह्यात करोनाचे संकट असूनही एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतातच कसे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली परीविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक अभिनव त्यागी, आयुश नोपाणी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.