कोल्हापूर : 2 मे पासून स्पॉट बिल वसुलीस प्रारंभ

कोल्हापूर – पाणीबिल रक्कम जागेवर भरणा करण्यासाठी स्पॉटबिल वसुली हा उपक्रम संपुर्ण शहरामध्ये दिनांक 2 मे 2018 पासून प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. महापालिकेच्या वतीने पाणीपट्टी आकारणी व वसुली प्रभावीपणे व पारदर्शकपणे करण्यासाठी सन 2016 पासून स्पॉट बिलींग हा महत्वाकांक्षी प्रकल्प चालू करण्यात आला होता. शहराच्या काही भागामध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आलेला हा उपक्रम आता संपूर्ण शहरात राबवण्यात येणार आहे.

शहरातील सर्व नागरीकांना व कोल्हापूर शहर पाणी पुरवठा केंद्रावर अवलंबून असलेल्या आसपासच्या ग्रामीण भागातील नागरीकांना या अंतर्गत  जाहिर आवाहन करण्यात आले आहे की, महानगरपालिकेकडील नागरी सुविधा केंद्राकडे पाणी बिल भरणा करुन घेणेत येत असले तरी, ज्यांना नागरी सुविधा केंद्रामध्ये पाणी बिल भरणा करणे शक्य होत नाही अशा नागरीकांनी कोल्हापूर शहर पाणी पुरवठा विभागाकडील आपले भागातील संबधीत मिटररिडर यांचेकडे आपले पाणी बिल भरणा करावयाचे आहे व रितसर पोहच पावती घेणेत यावी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)