कोल्हापूर : विद्यापीठाच्या नॅनो सायन्स टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांचे यश

कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या विशेष अनुदानातून शैक्षणिक वर्ष 2012-13 पासून सुरू करण्यात आलेल्या स्कूल ऑफ नॅनो-सायन्स अँड टेक्नॉलॉजी या अधिविभागाची बीएस्सी- एमएस्सी (एकत्रित)अभ्यासक्रमाची पहिली बॅच सन २०१६-१७ मध्ये उत्तीर्ण होऊन बाहेर पडली आहे.

या पहिल्या बॅचच्या अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले संशोधनाचे कसब सिद्ध करून घवघवीत यश मिळविले आहे. त्यांच्यामुळे हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा विद्यापीठाचा निर्णय अत्यंत समयोचित असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे मत स्कूल ऑफ नॅनो-सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजीचे समन्वयक तथा विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.एस. पाटील यांनी व्यक्त केले.

विद्यापीठाच्या नॅनो सायन्स व तंत्रज्ञान अधिविभागाच्या या पहिल्या पंचवार्षिक बॅचच्या कामगिरीचा आढावा घेताना डॉ.पाटील म्हणाले,एमएस्सीच्या शेवटच्या वर्षातील दहा विद्यार्थ्यांनी त्यांच्या संशोधन प्रकल्पाच्या दरम्यान दहा आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकांमध्ये आपले शोधनिबंध प्रकाशित केले. या विद्यार्थ्यांपैकी सात विद्यार्थ्यांची निवड दक्षिणकोरिया आणि तैवान येथील विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये पीएच.डी. साठी निवड झाली.

या विदयार्थ्यांचे संशोधनातील योगदान पाहता कुलगुरु डॉ.देवानंद शिंदे यांनी संशोधन प्रकाशित करण्यासाठी दरवर्षी दहा विद्यार्थ्यांना संशोधन फेलोशिप देण्याचा निर्णय घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)