कोल्हापूरात वाहतूक शाखेच्या महिला पोलिसावर चाकुने वार

कोल्हापूर – भवानी मंडप परिसरात दूचाकी लावू नको, असे सांगितल्याच्या रागातून तरुणाने शहर वाहतूक शाखेच्या महिला कॉन्स्टेबलवर चाकुने हल्ला केला. रुपाली यल्लाप्पा जोंधळे (वय 28, रा. चिंचवाड, ता. करवीर) असे जखमीचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. या हल्ल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तरुणास जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. शहनाज महमद बागवान (वय 20, रा. सी वॉर्ड, बागवान गल्ली, बिंदू चौक) असे आरोपीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी, कॉन्स्टेबल रुपाली जोंधळे या सोमवारी सकाळी नऊपासून भवानी मंडप मेन राजाराम हायस्कूलचे प्रवेशद्वारासमोर वाहतूक बंदोबस्ताचे काम करीत होत्या. दूपारी साडेबाराच्या सुमारास शहनाज बागवान हा दूचाकी घेवून आला. भवानी मंडप येथील राजाराम हायस्कूलच्या प्रवेशद्वारासमोर तो दूचाकी पार्किंग करुन जावू लागला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी जोंधळे यांनी दूचाकी बाजूला घेण्यास सांगितले. त्याने ऐकले नसल्याने त्या स्वत: दूचाकी बाजूला घेवू लागल्या असता जोंधळे याने त्यांचा हात पकडून खिशामध्ये लपवलेला चाकूने त्यांच्या उजव्या हातावर वार केला. हल्ल्यानंतर तो पळून जावू लागला. जोंधळे यांनी आरडाओरड करताच येथील नागरिकांनी त्याला पकडले. हाकेच्या अंतरावरील जुना राजवाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयिताला अटक केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)